मुंबई : विकी कौशल (Vicky Kaushal) नुकताच काश्मीरमधील उरी बेस कॅम्पमध्ये (Uri Based Camp) पोहोचला होता. त्याला भारतीय सैन्य दलाचे आमंत्रण मिळाले. विकीने स्वत: उरी बेस कॅम्प भेटीबद्दल काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. विकीने फोटोंसह एक खास चिठ्ठी देखील लिहिलेली आहे. या नोटमध्ये विकीने भारतीय सैन्यदलाला उरी बेस कॅम्पमध्ये आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत.


विकी कौशलने चिठ्ठीत काय लिहिलंय ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकी कौशल याने चिठ्ठीत लिहिले की, "काश्मीरच्या उरी बेस कॅम्पमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल भारतीय सैन्यदलाचे मनापासून आभार. तुम्ही मला स्थानिकांसोबत एक सुंदर दिवस घालविण्याची संधी दिली, विकी कौशलने  आमच्या महान सैन्य दलांसह वेळ घालवला हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. विकीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो भारतीय सैन्य दलातील सैनिक आणि स्थानिक लोकदेखील दिसत आहेत.



'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित


विकी कौशलच्या उरी बेस कॅम्प व्हिजिटचे हे फोटो सोशल मीडियावर  व्हायरल होत आहेत. या फोटोंनी चाहत्यांना पुन्हा विकी कौशलच्या 'उरीः द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटाची आठवण करून दिली. 'उरी' चे दिग्दर्शक आदित्य धर यांनीही फोटोंवर भाष्य करताना लिहिले की 'बर्‍याच आठवणी परत आण.' विकी कौशलचा 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट वर्ष २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तो सर्वात  हिट ठरला होता. विकीच्या या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे त्यांला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. हा चित्रपट भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकच्या घटनेवर आधारित होता.


उधम सिंगच्या बायोपिकमध्ये दिसणार विकी


वर्कफ्रंट बद्दल बोललो तर लवकरच विकी उधम सिंग आणि सॅम मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या दोन चित्रपटांशिवाय विकी 'द अमर अश्वत्थामा' आणि करण जोहरच्या कालखंड नाटक 'तख्त' मध्येही दिसणार आहे.