Aamir Khan Kiran Rao Video Ira Khan Wedding: अभिनेता आमिर खानची लेक इरा खान बॉयफ्रेण्ड नुपूर शिखरेबरोबर विवाहबंधनात अडकली. मुंबईतील ताज एण्ड्समध्ये झालेल्या सोहळ्यात दोघांनी लग्न केलं. या लग्न सोहळ्याला आमिर खानबरोबरच त्याची पहिली पत्नी रिना दत्ता आणि मुलगा जुनैद खानही उपस्थित होता. तसेच आमिरची दुसरी पत्नी किरण राव आणि त्यांचा मुलगा आझाद राव खानही लग्नाला हजर होते. या लग्न सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर फोटोंसाठी पोज देताना या संपूर्ण कुटुंबाचे फोटो सध्या चर्चेत आहेत. मात्र यातील एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


अचानक किरणला किस केलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चर्चेत असलेल्या व्हिडीओमध्ये आमिर खान किरण रावकडे चालत येता दिसतो. किरण ही लेक आझादच्या बाजूला उभी असते. आमिर तिच्याशी काहीतरी बोलतो. संपूर्ण ग्रुप फोटोसाठी पोज देत असतानाच अचानक आमीर बोलता बोलता किरणला किस करतो. आमीर ओंजळीत किरणचा चेहरा पकडून गालावर किस घेताना दिसतो. किरणच्या गालावर किस केल्यानंतर आमीर तिथून निघून जातो आणि फोटोसाठी पोज देत इरा आणि नुपूरच्या मागे उभा राहतो. आमीर खान फोटोसाठी पोज देताना किरणलाही फोटोमध्ये ये असं सांगताना दिसतो.


कोणी काय परिधान केलेलं?


आमीर खानने लेकीच्या लग्नामध्ये क्रिम कलरची शेरवानी आणि गुलाबी फेटा घातला होता. आमीरची पहिली पत्नी रिना दत्ताने पांढऱ्या, निळ्या आणि सोनेरी रंगाचे कपडे परिधान केलेले. किरण रावने गोल्डन आणि हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. इराने डीप कट असलेली चोळी त्याखाली निळ्या, गुलाबी रंगाची धोती पॅण्ट घातली होती. इराने चंदेरी रंगाचा दुपट्टा तिच्या डोक्यावरुन घेतला होता. नुपूरने निळ्या रंगाचा बंदगळा सूट घातला होता. मात्र त्यांच्या कपड्यांपेक्षा आमिरने किरणला केलेला किस अधिक चर्चेत आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...



10 दिवस चालणार लग्नसोहळा


इरा आणि नुपूर हे बुधवारी नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकले. त्यानंतर ते दोघेही उदयपूरला डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं सांगितलं जात आहे. उदयपूरमध्ये लग्नाचे विधी, संगीत, हळद हे सभारंभ होतील, अशी माहिती समोर येत आहे. बुधवारपासून सुरु झालेला हा सोहळा पुढील 10 दिवस चालणार आहे. लग्नाच्या कार्यक्रमांना 3 जानेवारीपासून सुरुवात झाली असून हे कार्यक्रम 13 जानेवारीपर्यंत चालतील. विशेष म्हणजे बॉलिवूड कलाकारांसाठी मुंबईत 13 जानेवारीला एका खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.