मुंबई : अभिनेत्री शोभिता धुलिपालाचं नाव सध्या खूप चर्चेत आहे.  खरंतर, ही अभिनेत्री सध्या साऊथचा सुपरस्टार नागा चैतन्यसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा शोभिताच्या प्रेमात पडला असल्याच्या बातम्या आहेत. दरम्यान, आता शोभिता धुलिपालाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्रीवर जोरदार टीका 
नुकताच आदिवी शेष यांच्या 'मेजर' चित्रपटात दिसलेल्या शोभिता धुलिपालाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिचं मधले बोट दाखवताना दिसत आहे. नुकतीच सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका झाली आणि समंथा आणि नागा यांच्या घटस्फोटाला ते जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. नस


शोभिताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे
दरम्यान, आता शोभिता विमानात मधलं बोट दाखवत असल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. शोभिता असे हावभाव का आणि कोणासाठी करत आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी, नेटिझन्सचा दावा आहे की ही शोभिताची नागा चैतन्यसोबतच्या लिंक-अपच्या अफवांवरची प्रतिक्रिया आहे.



शोभिताने नकार दिला
खरंतर, अपलोड करण्याची वेळ आणि तारीख सार्वजनिक करण्यात आलेली नाही. योगायोगाने, शोभिताने या अफवांचं खंडन केलं आहे, त्यांना निराधार म्हटलं आहे, तर नागा चैतन्यने मात्र अद्यापतरी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.