VIDEO : इटलीतील विवाह समारंभानंतर दीप-वीर भारतात परतले
नवविवाहीत दाम्पत्य रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोणच्या स्वागतासाठी घर सजलं...
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादकोण आता विवाहबंधनात अडकले. १४-१५ नोव्हेंबर रोजी या जोडप्यानं इटलीतील लेक कोमो इथं वेगवेगळ्या परंपरेनुसार एकमेकांची साथ देण्याच्या आणाभाका घेतल्यात. इटलीत पार पडलेल्या या हायप्रोफाइल विवाहानं आपल्या फॅन्सला मात्र बराच काळ बेचैन केलं... आणि त्यांचे फोटोही फॅन्सच्या लवकर नजरेस पडले नव्हते... परंतु, आता मात्र हे नवविवाहीत दाम्पत्य भारतात परतलंय. आज सकाळी हे जोडपं मुंबई एअरपोर्टवर दिसलं... यावेळी दोघांनीही सोनेरी रंगाचा इंडियन ड्रेस परिधान केले होते.
गुरुवारी सायंकाळपासूनच रणवीर सिंहच्या मुंबई स्थित घर सजताना दिसतंय. शनिवारी रात्री या घराची सजावट आणि रोषनाई आणखीनच वाढत गेली... यावरून हे दोघं लवकरच मुंबईत दाखल होणार असल्याचं स्पष्ट झालं... आणि आज सकाळी त्यांना मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं.
मुंबईतही या रॉयल वेडिंगची धुमधाम सुरू झाली. याचं कारण म्हणजे, सिंधी कुटुंबातून असलेल्या रणवीर सिंहच्या घरी नववधूचा पहिल्यांदा प्रवेश झाल्यानंतर अनेक विधींची आखणी करण्यात आलीय. त्यासाठी नवविवाहीत जोडप्याच्या स्वागतासाठी अख्खं घर सजलंय.
दीपिका पादकोण - रणवीर सिंहचा विवाह सोहळा इटलीतील लेक कोमो इथं पार पडला. १४ नोव्हेंबरला दीपिकाच्या कोकणी पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला तर १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी आपल्या विवाहाप्रसंगीचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर लीक होऊ नयेत, याची पुरेपूर काळजी घेतली गेली. याचाच एक भाग म्हणून लग्नात सहभागी झालेल्या पाहुण्यांनाही फोन लग्न सभागृहात नेण्याची परवानगी दिली गेली नव्हती.
दीपिका आणि रणवीर १० ऑक्टोबर रोजी इटलीला रवाना झाले होते. भारतात परतल्यानंतर आता या दोघांच्या लग्नाच्या रिसेप्शनचंही आयोजन करण्यात आलंय. २१ नोव्हेंबर रोजी बंगळुरूत तर २८ नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये हे रिसेप्शन पार पडेल.
नुकतेच, कास्टिंग डायरेक्टर शन्नो शर्मा हिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणवीर सिंहच्या हळदी समारंभाचे काही फोटो शेअर केलेत. यामध्ये रणवीरच्या गालांवर हळद लागलेली दिसतेय... आणि त्याच्यासोबत शन्नो शर्मा सेल्फी घेतेय. सफेद रंगाच्या कुर्त्यात बाजीराव तिच्यासोबत खुपच खुश दिसतोय.