मुंबई : अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणवीर सिंह नुकतेच एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच स्टेजवर दिसले. ऑफ स्क्रीनही या दोघांची केमिस्ट्री धम्माल असल्याचं या निमित्तानं प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमात 'पद्मावत' या सिनेमातील 'खलीबली' या गाण्यावर रणवीर थिरकताना दिसला... आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी दीपिका रणवीरच्या डान्स स्टेप्स फॉलो करत होती. रणवीरनं हा क्षण सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. 



दीपिका आणि रणवीर यावेळी एकमेकांसोबत खूपच खूश दिसत होते.