मुंबई : सध्या सगळीकडे धूम आहे ती बिझनेसमन मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या ईशा अंबानीच्या लग्नाची... ईशाचे प्री वेडिंग कार्यक्रम राजस्थानमधील उदयपुरमध्ये आयोजित केले आहेत. आता या लग्नाच्या संगीत कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील हा एक खास व्हिडिओ... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 73 व्या वर्षी जावेद अख्तर डान्स करताना दिसत आहे. बहुदा हा पहिला कार्यक्रम असेल जेव्हा जावेद अख्तर कोणत्या तरी कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहे. 



एवढंच नाही तर त्यांच्यासोबत पत्नी शबाना आजमी सुद्धा मुडमध्ये डान्स करताना दिसत आहे. 1951 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अलबेला' सिनेमातील 'शोला जो भडके दिल मेरा धडके...'या गाण्यावर ठेका धरताना दिसले. 



या व्हिडिओत जावेद अख्तर अभिनेता भगवान दादा यांच्या डान्स स्टेपप्रमाणे नाचताना या व्हिडिओत दिसत आहे. जावेद अख्तर यांच्यासोबत या गाण्यावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि जावेद जाफरी देखील नाचताना दिसत आहेत. 


12 डिसेंबरला ईशा - आनंद घेणार सात फेरे 


ईशा आणि आनंद पीरामल यांच लग्न 12 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे. ईशा आणि आनंद यांच शिक्षण एकत्र झालं आहे. दोघांच बालपण एकत्र गेले असून बराच काळ एकत्र घालवला आहे. 


महाबळेश्वरला आनंदने ईशाला याचवर्षी प्रपोझ केलं असून त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. सप्टेंबरमध्ये इटलीच्या लेक कोमोमध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला. 


पाहुण्यांसाठी खास गेम 


रविवारी अंबानी आणि पीरामल कुटुंबाद्वारे एका कार्निवलचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच एका फॅशन विकचं देखील आयोजन केलं होतं. फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने हा कार्यक्रम होस्ट केला होता. यानंतर सगळ्या पाहुण्यांकरता ग्रँड पार्टी आयोजित केली होती.