मुंबई : बॉलीवूड गायिका नेहा कक्कर तिच्या उत्साहीपणा आणि बोल्डनेसमुळे खूप चर्चेत असते. नेहा केवळ गाण्यामुळेच नाही तर सोशल मीडियावर फनी व्हिडिओंमुळेही चर्चेत असते. नुकताच नेहा कक्करचा एक व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये ती जमिनीवर लोळून नागिन डान्स करताना दिसत आहे. नेहा पती रोहनप्रीत सिंगसोबत नागिन स्टेप्स करण्याचा प्रयत्न करत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून स्टार बनलेल्या नेहाची ही शैली हृदयाला भिडणारी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा कक्कर एक अप्रतिम गायिका तर आहेच पण ती एक चांगली डान्सर देखील आहे. नुकतीच नेहा मित्राच्या बर्थडे पार्टीला गेली होती. तिकडे नेहाने पार्टीत अनेक गाण्यांवर डान्स केला. मात्र या पार्टीत नेहाचा नागिन डान्स सगळ्यात धमाल होता. नेहाने पती रोहनप्रीतसोबत जमिनीवर लोळत नागिन डान्स स्टेप्स केल्या आहेत. नेहाचा हा डान्स पाहून तिथे उपस्थित पाहुणे पोट धरुन हसताना दिसत आहेत.  पण तरी देखील ती अजिबात लाजली नाही आणि याची भरभरून मजा घेतेय.


नेहाचा हा व्हिडिओ रोहनप्रीतने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत नेहाने लिहिलं आहे की, 'जर तुमचा पार्टनर दारू न पिऊन असा डान्स करत असेल तर लगेच त्याच्याशी लग्न करा.' रोहनने या व्हिडिओला 'मिस यू लाडो, लवकर ये प्लीज नेहू' असं कॅप्शन दिलं आहे.


नेहा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नेहाचा हा डान्स व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. लोकांनी मोकळेपणाने कमेंट्स केल्या आहेत आणि दोघांच्या केमिस्ट्रीची प्रशंसा केली आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं आहे की, 'म्हणूनच आम्ही या मुलीच्या प्रेमात पुन्हा-पुन्हा पडतो.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचं २०२० मध्ये लग्न झालं. चंदिगडमध्ये तिची आणि रोहनप्रीतची भेट झाली. दोघांनी एकत्र काही म्युझिक व्हिडिओ देखील केले आहेत. नेहा आणि रोहनची लव्हस्टोरीही खूप चर्चेत आहे. नेहाने गायलेल्या 'दिलबर-दिलबर' या गाण्याला नुकतीच 4 वर्षे पूर्ण झाली आहेत.