मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली अगदी त्या दिवसापासून मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेले. कलाकारांची फौज पाहता अगदी कमी काळातच मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. त्यातही एका चेहऱ्याला विशेष ओळख मिळाली . तो चेहरा म्हणजे 'पाठक बाई' यांचा. मुलगी, पत्नी, वहिनी इतकच नव्हे, तर शिक्षिका असावी तर अशी, हे असं मापदंड 'अंजली बाईं'ची व्यक्तीरेखा पाहून अनेकांनीच आखलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अंजली बाई' किंवा 'अंजली पाठक' ही व्यक्तीरेखा अतिशय प्रभावीपणे साकारण्याची किमया केली ती म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर हिने. याच बरोबर या मालिकेत राणा दा ही भुमिका साकरुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता हार्दिक जोशी. 


या दोघांनी या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळवली विशेष म्हणजे राणा अंजलीची जोडीला संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. ही जोडी चाहत्यांना ईतकी आवडली की, या दोघांचे अनेक व्हडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओत राणा अंजली लग्नाच्या पोशाखात दिसत आहेत. यावरुन सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाचीही चर्चा होताना दिसत आहेत. पण असं काहीही नसून ही एक अफवा आहे. राणा अंजलीचा लग्नाच्या पोशाखात व्हायरल होणारा हा व्हिडिओ एका फोटोशूट दरम्यानचा आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोशल मीडियावर राणादा अंजलीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अंजली बाईंचे इंस्टाग्रामवर 1.1M ईतके फॉलोअर्स आहेत तर राणादाचे इंस्टाग्रामावर 290k ईतके फॉलोअर्स आहेत. काही महिन्यांपुर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र तरीही या जोडीची क्रेझ कमी झालेली नाही.