मुंबई : सारा अली खान आणि शुभमन गिलच्या रुमर्ड कपलच्या नवीन व्हिडिओने त्यांच्या नात्याच्या अंदाजांना खतपाणी घातलं आहे. बुधवारी दोन व्हिडिओ समोर आले ज्यात एकात सारा आणि शुभमन एका हॉटेलमधून बाहेर पडताना दिसले तक दुसऱ्या व्हिडिओत ते दोघं फ्लाइटमध्ये एकमेकांच्या शेजारी बसताना दिसले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या व्हिडिओमध्ये सारा गुलाबी रंगाचा टँक टॉप घालून हॉटेलच्या लॉबीमधून बाहेर पडताना दिसत आहे. ती बाहेर पडताच, कॅमेराने तिला चारही बाजूने पॅन केलं आणि तिच्यासोबत असणारी व्यक्तीलाही कॅमेरात कैद केलं आहे. हा व्हिडिओ समोर येताच अचा अंदाज लावला जात होता की, अभिनेत्रीसोबत दिसणारी व्यक्ती शुभमनसारख दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, सारा फ्लाइटमध्ये चाहत्यांसोबत सेल्फी घेताना आणि नंतर तिच्या सीटवर जाताना दिसतेय. या दुसऱ्या व्हिडिओतही साराच्या बाजूला ती व्यक्ती दिसत आहे


एका यूजरने ट्विटरवर लिहिलं आहे की, 'कदाचित मी चुकीची आहे पण शुभमन आणि सारा एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. हॉटेलचा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्याने लिहिलं आहे की, सारा आणि शुभमन पुन्हा एकत्र आले आहेत का? हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडूनही त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. 


चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ती वीर पहाडियासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दुसरीकडे शुभमन गिल हा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला डेट करत होता. सारा शेवटची आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे' मध्ये दिसली होती.