RRR Team Reaction After Wins Oscars 2023 : दिग्दर्शक एस एस राजमौली (ss rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटातील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्याने भारतासाठी इतिहास रचला आहे. नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं होतं. त्यानंतर आज (सोमवारी) झालेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात (Oscars 2023) या गाण्याने पुरस्कार जिंकला आहे. भारताने पहिल्यांदाच या कॅटेगरीमध्ये पुरस्कार जिंकल्याने सर्वच  स्तरातून त्याचे कौतुक करण्यात येत आहे. 15 गाण्यांमधून नाटू नाटू हे गाणे सर्वोत्कृष्ट म्हणून निवडण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा पुरस्कार जिंकल्यानंतर आरआरआरच्या टीमचा (RRR Team) आनंद गगनात मावत नव्हता. पुरस्कार जिंकल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पुरस्काराची घोषणा होताच जोरात ओरडत त्यांनी हा आनंद व्यक्त केला आहे. याचा व्हिडीओसुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी नामांकन जाहीर झाल्यानंतर आरआरआरची संपूर्ण टीम श्वास रोखून बसली होती. पण नाटू नाटूला पुरस्कार जाहीर होताच सर्वात मागे बसलेल्या आरआरआरच्या टीमचा आनंदाने उफाळून आला.


पाहा व्हिडीओ - 



सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीसामध्ये भारताचा हा दुसरा ऑस्कर पुरस्कार आहे. ए.आर. रहमानच्या जय हो या गाण्यासाठी 2009 मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. मात्र  स्लमडॉग मिलेनियर हा अमेरिकन निर्मित चित्रपट होता आणि आरआरआर हा चित्रपट संपूर्ण भारतीय निर्मितीचा असल्याने या पुरस्काराचे महत्त्व वाढलं आहे.


पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटूची छाप


दीपिका पादुकोण ऑस्कर सोहळ्यात पुरस्कार देण्यासाठी पोहोचताच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. दीपिकाने आधी आरआरआर चित्रपटाबद्दल सांगितले आणि नंतर नाटू नाटू गाण्याचा परफॉर्मन्स सुरू होणार असल्याचे सांगितले. नाटू-नाटूचे गायक राहुल सिपलीगुंज आणि कालभैरव यांनी स्टेजवर मोठ्या उर्जेने हे गाणं गाण्यास सुरुवात करताच पुरस्कार सोहळ्यात उत्साह निर्माण झाला. स्टेजवर परदेशी नृत्य कलाकारांनी त्यांना पाठिंबा दिला.