सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर अडकणार लग्नबंधनात; `या` क्रिकेटरने केला खुलासा
सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आाता पुन्हा एकदा सारा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शुभमन गिल सध्या त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून शुभमनचे नाव क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं जात आहे. दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र लपून-छपून केलेलं प्रेम जास्त दिवस लपून राहत नाही, असंच काहीसं शुभमन आणि सारासोबतही घडू लागलं आहे.
सारा अली खाननंतर त्याने खुलासा केला
कालांतराने दोघांच्या नात्याबद्दल उघडपणं बोललं जाऊ लागलं आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण 8'मध्ये शुभमनसोबतच्या नात्याची पुष्टी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांचं नातं पक्कं झालं आहे. वास्तविक UAE चा क्रिकेटर चिराग सूरीने शुभमन आणि सारा यांच्या नात्याला पुष्टी देणारं एक मोठं वक्तव्य केलं आहे.
चिरागने घेतलं शुभमनचं नाव
सध्या सोशल मीडियावर चिरागचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एका रिपोर्टरने चिरागला विचारलं की, लग्न होणारा पुढचा खेळाडू कोण असेल? यावर उत्तर देताना चिरागने लगेच शुभमन गिलचं नाव घेतलं. यानंतर रिपोर्टमध्ये त्याच्या भावी पत्नीचं नाव विचारलं. चिराग न डगमगता म्हणाला, 'सारा, सचिन तेंडुलकरची मुलगी.' आता चिरागचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
चिरागचा व्हिडीओ व्हायरल
चिरागचा हा व्हिडिओ आणि सारा अली खानचं वक्तव्य पाहून असं म्हणता येईल की, शुभमन आणि सारा तेंडुलकरने कितीही प्रयत्न केले तरी आता त्यांच्यातील नातं समोर येऊ लागलं आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया यूजर्सनी चिरागच्या व्हिडिओवर एकामागून एक मजेशीर कमेंट करायला सुरुवात केली आहे. मात्र, दोघांच्या गोपनीयतेची काळजी घेण्याचं अनेकांनी बोललं आहे. एका यूजरने लिहिले की, 'सारा आणि गिलला त्यांच्या नात्याबद्दल बोलण्याची संधी दिली तर बरे होईल.' अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते या व्हिडीओवर करत आहेत.