मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील किंग खान सध्या आपल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे, आज 10 जुलै रोजी बीटाउनचे सगळे स्टार्स त्यांच्या चाहत्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा देत आहेत. या एपिसोडमध्ये शाहरुख खानने नुकतंच त्याच्या घरून मन्नतच्या गॅलरीमध्ये येऊन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याचबरोबर शाहरुख खानने सगळ्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर काही काळापूर्वी सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टा हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये किंग खान त्याच्या घराच्या बाल्कनीत उभा दिसत आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत मुलगा अबराम खानही दिसत आहे. बाल्कनीत वडील आणि मुलगा दोघंही घराबाहेर उभे दिसत असून गर्दीला तोंड देत आहेत. यादरम्यान शाहरुख आणि त्याचा मुलगा अबराम चाहत्यांना हाय-हॅलो करताना दिसत आहे आणि नंतर हात जोडून अभिवादन करत आहेत.


यादरम्यान शाहरुखने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या डेनिम पँन्टसोबतच गॉगल घातला होता. तर दुसरीकडे अबरामने लाल रंगाचा टी-शर्ट घातला होता. फोटोंमध्ये अबरामही वडील शाहरुखप्रमाणेच स्वॅगमध्ये दिसत आहे. शाहरुख-अब्रामचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान पठाण या चित्रपटातून पुनरागमन करत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पठाण जानेवारी २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोणदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय शाहरुख खानने राजकुमार हिरानीसोबत डंकी या चित्रपटाची घोषणाही केली आहे.