मुंबई : अश्विनी भावे हिच्या 'मांजा' या चित्रपटाचा व्हिडिओ ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मांजा या सिनेमातून अभिनेत्री अश्विनी भावे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. हा सिनेमा २१ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.


'मांजा' चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन दिग्दर्शक जतिन वागळे यांनी केलंय. अश्विनी भावे सोबतच या चित्रपटात 'बालक पालक' फेम रोहित फाळके आणि 'डान्स इंडिया डान्स' फेम सुमेध मुद्गलकर देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत, त्यामुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजूनच वाढली आहे यात शंकाच नाही.