गुजरातची रिया सिंघा ठरली यंदाची मिस युनिव्हर्स इंडिया

आता या सौदर्यवतीच्या पुढील वाटचालीकडे संपुर्ण भारताचे लक्ष्य लागले आहे. कार्यक्रमादरम्यान विजेत्या मुलीच्या सौदर्यांने आणि उत्तरांनी सर्वांनाच भांबावून सोडले होते. 

Sep 23, 2024, 14:52 PM IST

2024 ची मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धा 22 सप्टेंबरला संपन्न झाली असून, यंदाची विजेती भारताला मिळाली आहे.  

1/7

मिस युनिव्हर्स इंडिया 2024

मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ची महाअंतिम फेरी यंदा, राजस्थानमधील 'जयपूर' या ठिकाणी घेण्यात आली. हा कार्यक्रम 22 सप्टेंबरला रविवारी संपन्न झाला. मिस युनिव्हर्स 2015 ची विजेती 'उर्वशी रौतेला' ही या कार्यक्रमाची परिक्षक होती.     

2/7

कार्यक्रम फारच उत्साहाच्या वातावरणात पार पडला. 'श्वेता शारदा'नंतर आता 'रिया सिंघा' हिने 'मिस युनिव्हर्स इंडिया'चा किताब पटकावला आहे. विजयानंतर रियाने मनमोकळेपणाने तिच्या भावना व्यक्त केल्या. पत्रकारांशी बोलताना तिचा आनंद गगनात मावत नव्हता. चेहऱ्यावर उत्साही हास्य ठेऊन ती गप्पा मारत होती.

3/7

रीया आहे द टिन अर्थ

रिया सिंघाचे वय 19 वर्षे आहे. रिया 'गुजरात'ची आहे. रियाच्या इंस्टाग्राम बायोत नमूद केल्यानूसार, ती एक अभिनेती आणि एक अनुभवी टेडवक्ती आहे. याआधी रिया सिंघाने 'द टिन अर्थ 2023' हा किताब जिंकला होता. आता पुढच्या वाटचालीत, रिया 'ग्लोबल मिस युनिव्हर्स 2024' मध्ये भारतातचे प्रतिनिधित्त्व करेल.

4/7

रियाने आनंदव्यक्त केला

या विजयानंतर मिडियाशी बोलताना, रियाने आनंदव्यक्त केला. तिने सांगितले की, ही स्पर्धा जिंकण्यासाठी तिने दिवसरात्र एक करुन कष्ट घेतले होते. तिचा हा विजय तिला मिळालेला नाही, तर तिने कमावलेला आहे. ती म्हणाली, "मिस युनिव्हर्स इंडिया 2024 जिंकण्यासाठी ती नक्कीच पात्र आहे. या विजयासाठी ती कायमच कृतज्ञ राहीन." पुढे तिने तिच्याआधी ज्यांना हा मान मिळाला होता, त्यांच्याकडून कायमच प्रेरणा मिळते असे वर्तवले. 

5/7

पोशाख

अंतिम फेरीत रियाने चमकदार पिच-सोनेरी रंगाचा पोशाख परिधान केला होता. 'स्विमसूट' फेरीमध्ये तिने लालरंगाचा स्विमसूट घातला होता. ज्यासाठी तिची फार वाहवाह झाली होती. पोशाख फेरीत तिने पांढरा,लाल,पिवळा अशा रंगांचे मिश्रण असणारा पोशाख परिधान करुन ओढणी घेतली होती. हातात तिने शिवलिंग घेतले होते. 

6/7

ताजमहाल मुकूटाने सन्मानीत

उर्वशी रौतेलाच्याहस्ते रिया सिंघाला 'ताजमहाल मुकूटा'ने सन्मानीत करण्यात आले. उर्वशीने सांगितले की, यंदा भारत परत एकदा मिस युनिव्हर्सचा मुकूट पटकावेल. मला माहिती आहे की, सर्वच मुलींनी फार कष्ट घेतले आहेत. भारताचे नेतृत्त्व या मुली नक्कीच चांगले करतील. विजेत्यांबरोबरच सहभीगी झालेल्या सर्वच मुली, कष्टाळू आणि सुंदर आहेत. 

7/7

पुढील वाटचाल

आता रिया सिंघा भारतातचे प्रतिनिधित्त्व 'मिस युनिव्हर्स 2024' मध्ये करेल. त्यासाठी ती पुढील तयारी करत आहे. आता सर्व भारतीयांची नजर रियावर आहे. रिया मिस युनिव्हर्स इंडिया प्रमाणेच पुढच्या टप्पातसूद्धा छान प्रदर्शन करेल, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.