Vidya Balan Fall On Stage : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'भूल भूलैया 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील किंवा 'भूल भूलैया' च्या सीरिजमधील 'आमी जे तोमर' या गाण्याचं सगळ्याच चाहत्यांसाठी महत्त्व आहे. 'भूल भूलैया' किंवा या चित्रपटाच्या कोणत्याही सिक्वलमध्ये जर हे गाणं नसलं तर ते अर्धवट वाटू लागेल हे आपल्याला माहित आहे. अशात आता याच गाण्याचं तिसरं व्हर्जन अर्थात तिसऱ्या भागातील गाणं समोर आलं आहे. हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून यात विद्या बालन आणि तिच्यासोबत माधुरी दीक्षित दिसत आहे. दरम्यान, या गाण्याच्या लॉन्चच्या वेळी त्या दोघी दिसल्या. त्यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर त्यात विद्या बालन ही डान्स करताना खाली पडल्याचे दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्या आणि माधुरीच्या डान्सचा हा व्हिडीओ वरिंदर चावलाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ 'भूल भूलैया 3' या चित्रपटातील 'आमी जे तोमर' या गाण्याचं नवं व्हर्जन पाहायला मिळालं. नवं व्हर्जन यासाठी कारण यात विद्या बालनसोबत माधुरी दीक्षित दिसत आहे. त्या दोघी या गाण्याच्या लॉन्चच्या वेळी विद्या आणि माधुरी दोघी डान्स करताना दिसतात. तर डान्स करत असताना विद्याला तोल जातो आणि ती स्टेजवरच खाली पडते. मात्र, इतकं तरी सुद्धा विद्यानं तिथेच डान्स थांबवला नाही तर तिनं स्वत: ला सावरत डान्स पूर्ण केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुळात जेव्हा अनेकांनी हा डान्स पाहिला तेव्हा त्यांना वाटलं की विद्याची ही डान्स स्टेपच होती. मात्र, विद्यानं त्यानंतर जेव्हा स्टेजवर झालेल्या गडबडीविषयी सांगितलं तेव्हा सगळ्यांना कळलं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, त्यांच्या या परफॉर्मन्सनंतर विद्यानं सांगितलं की 'माधुरी दीक्षितसोबत स्क्रीन शेअर करणं ही तिच्या सन्मानाची गोष्ट आहे.' तिनं हे देखील सांगितलं 'एकाच फ्रेममध्ये राहणं आणि तिच्यासोबत डान्स करणं... माझ्या बहिणीनं मला आज सांगितलं की तुला तिच्यासारखं व्हायचं होतं आणि आज तू तिच्यासोबत डान्स करतेस, तर ही इतकी मोठी गोष्ट नाही का? माझ्यासाठी असलेली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी मी आभारी आहे. मला खूप मज्जा आली. आजही पाहा, पडले पण तरी सुद्धा त्यांच्याभरोशानं मी परफॉर्म केलं.'


हेही वाचा : 'भारतीय सेना पाकिस्तानसाठी दहशतवादी; साई पल्लवीच्या वक्तव्यावर देशवासियांचा संताप


'भूल भुलैया' च्या सीक्वलविषयी बोलायचं झालं तर 2007 मध्ये सगळ्यात पहिला अक्षय कुमार आणि विद्या बालन त्यात दिसले होते. त्यानंतर त्याचा दुसरा चित्रपट आला त्यात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवानी दिसले. आता या चित्रपटाचा तिसरा भाग 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.