मुंबई : झगमगत्या विश्वात (Film Industry) कलाकार कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आपल्या आवडत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात काय सुरु आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक चाहत्याच्या मनात शिगेला पोहोचलेली असते. महत्त्वाचं म्हणजे आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या मनात नक्की कोण आहे. सध्या अभिनेत्री विद्या बालनच्या (vidya balan) खासगी आयुष्याबद्दल एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत. ज्यात अभिनेत्री लग्नानंतरच्या जीवनाबद्दल बोलताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ आहे 'स्टार गिल्ड अवॉर्ड' शो दरम्यानचा. व्हिडीओमध्ये सलमान खान (Salman Khan) ऑडियंसमध्ये बसलेल्या सेलिब्रिटींसोबत मस्ती करताना दिसत आहे. (Vidya balan after marriage)


जेव्हा सलमान अवॉर्ड देण्यासाठी अभिनेत्री विद्या बालनला (vidya balan instagram) बोलावतो, तेव्हा भाईजान विद्याला तिच्या खासगी आयुष्याबद्दल एक प्रश्न विचारतो. 'लग्न झाल्यानंतर तुला कसं वाटत आहे?' या प्रश्नाचं उत्तर देताना विद्या तिच्या सिनेमातील एक डायलॉग बोलून दाखवते. 



विद्या म्हणते, 'शादी के बाद तो लगता है कि मुझे जो अच्छा लगता है, मुझे जो पसंद है, उसका मजा सिर्फ रात को ही आता है....', विद्याचं असं उत्तर ऐकून जमलेल्या सर्व सेलिब्रिटींना हासू आलं. (vidya balan malayalam movies)


विद्या बालनचे हे उत्तर ऐकून सलमान खान, करण जोहरपासून ते अनुष्का शर्मापर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्रीचा हा जुना व्हिडिओ पाहून चाहत्यांना हसू आवरता आले नाही. (vidya balan-Salman Khan)