मुंबई : विद्या बालन कायमच आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहिलेली आहे. घरातच रॅम्प वॉक केल्यानंतर आता विद्या बालन घरातच फोटोशूट करते. कोरोनाचा वाढता धोका पाहता विद्या बालनने घरातच फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे एकत्र येऊन काम करणं थोडं जोखमीचं आहे. यामुळेच विद्या बालनने आपल्या सेफ्टीच्या आणि हक्काच्या ठिकाणी फोटोशूट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विद्या बालनने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. विद्या बालनने आतापर्यंत पारंपरिक कपडे घालून फोटोशूट केलं आहेत. मात्र विद्या बालन कायमच यामध्ये सुंदर दिसते हे विधान खोटं ठरवलं आहे. विद्या बालनने वेस्टर्न आऊट फिटमध्ये फोटोशूट केलं आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. 



तसेच हे फोटोशूट याबाबतचा इशारा देत आहेत की, कुणीही काहीही विचार करू दे. जेवढ्या पारंपरिक कपड्यात विद्या बालन सुंदर दिसते तेवढ्याच सुंदर वेस्टर्न आऊट फिटमध्ये दिसते. या फोटोत तिने वेस्टर्न गाऊन घालते आहे. विद्या बालनने या फोटोत ग्रीन सीक्विन गाऊन घातला आहे. 


विद्या यातून सांगतेय की, चांगले कपडे घालून तुम्ही घरातच बसा. कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. असं असताना विद्या देखील घरातच फोटोशूट करत आहे. तसेच ती चाहत्यांना देखील सांगत आहे की, चांगले कपडे घालून तुम्ही देखील घरातच राहा.