मुंबई : बी-टाऊनचा एक असा अभिनेता ज्याच्या चित्रपटांमध्ये दमदार ऍक्शन आणि स्टंट प्रेक्षकांना भावते. विद्युत जामवालनं तामिळ चित्रपटसृष्टीत 'बिल्ला २' या चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर दमदार एन्ट्री घेतली. कमांडो चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पहिलं पाऊल टाकत त्याने रसिकांच्या काळजात स्थान मिळवलं. त्याच्या दमदार ऍक्शन आणि स्टंट नोंद आता ‘द रिचेस्ट’ने घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


‘द रिचेस्ट’ या पोर्टलने संशोधन करुन जगातील १० योद्ध्यांची एक यादी जाहिर केली आहे.  या यादीमध्ये भारतीय अभिनेता विद्युत जामवालचं देखील नाव आहे. शिवाय रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, जगप्रसिद्ध अ‍ॅडवेंचरर बेयर ग्रिल्स यांसारख्या मंडळींची देखील या यादीमध्ये नावे आहेत. 


‘द रिचेस्ट’ पोर्टलने या यादीला  '10 पीपल यू डॉन्ट वांट मेस विथ' असं नाव दिलं आहे. या यादीमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, शिफू शी यन मिंग, विटो पिरबजारी , गीगा उगुरु , हट्सुमी मसाकी , जेडी अँडरसन , मुस्तफा इस्माईल , मार्टिन लिचिस, बेयर ग्रिल्स या खतरनाक योद्ध्यांचा सामावेश आहे.