मुंबई : कलाविश्वात सर्वात जास्त चर्चेत असणारा विषय म्हणजे सेलिब्रिटींचे प्रेम प्रकरण. दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' शोमध्ये अनेक सेलिब्रिटी येतात, 'या' शोमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगत असतात. करणच्या शोमध्ये  विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) आगामी भागात दिसणार आहेत. आगामी भागाचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळी विजय देवरकोंडाने रश्मिकासोबत असलेल्या नात्याबद्दल खुलासा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रश्मिकाला 'Darling'म्हणतो विजय देवरकोंडा
देवरकोंडाने सांगितले की, तो रश्मिकाला 'डार्लिंग' म्हणतो. आम्ही दोन सिनेमात एकत्र केले आहेत. मला ती खूप आवडते. ती माझी चांगली मैत्रीण आहे आणि आम्ही खासगी आणि प्रोफेशनल जीवनाबद्दल देखील आम्ही बोलतो. असं देखीस विजय म्हणाला. 


'मी चाहत्यांना दुखवायचं नाही..'
देवरकोंडाने सांगितले की,  ज्या दिवशी माझं लग्न होईल आणि मुलं होतील, त्या दिवशी मी सर्वांना सांगेन आणि जोपर्यंत मी निर्णय घेत नाही, तोपर्यंत माझ्या नात्याबद्दल सांगणार नाही. मी माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना दुखावणार नाही. 


माझ्यावर प्रेम करणारे अनेक आहेत. चाहत्यांनी घरात भिंतीवर आणि मोबाईलमध्ये माझे फोटो आहेत. ते माझ्यावर प्रचंड प्रेम करतात, मला त्यांना दुखवायचं नाही. असं देखील अभिनेता म्हणाला. 


देवरकोंडाच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, देवरकोंडा लवकरचं 'लायनर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सिनेमात देवरकोंडासोबत अभिनेत्री अनन्या पांडे स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सिनेमा 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.