Boycott Liger ट्रेंडनंतर विजय देवरकोंडाचे ट्विट; म्हणाला, `आम्ही परत...`
पुढील आठवड्यात विजय देवरकोंडाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे
आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाला अलीकडेच सोशल मीडियावर बहिष्काराचा सामना करावा लागला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. बॉलीवूडला गेल्या काही काळापासून बॉयकॉट कल्चरचा (Boycott Trend) सामना करावा लागत आहे.
दरम्यान, पुढील आठवड्यात करण जोहरच्या (karan johar) प्रॉडक्शनचा लिगर (liger movie) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. करण जोहरचा चित्रपट असल्याने तो आधीपासूनच बॉयकॉट ट्रेंडला तोंड देत आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda ) मुख्य भूमिकेत आहे.
नुकतेच विजय देवराकोंडाने बॉयकॉट ट्रेंडवर भाष्य केल्याने त्याचा चित्रपटावरही बहिष्कार घालण्याची मागणी करण्यातय येऊ लागली आहे. तसेच #BoycottLigerMovie ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. त्यानंतर आता विजयने एक ट्विट केलं आहे.
दरम्यान, विजय देवरकोंडा यांनी एक ट्विट केले आहे. आपण ही लढाई लढण्यास तयार असून इतरांची चिंता करत नसल्याचे विजयने म्हटले आहे.
विजयने तेलुगुमध्ये हे ट्विट केले आहे. 'जेव्हा आपण धर्मानुसार राहतो, तेव्हा आपल्याला इतरांची काळजी करण्याची गरज नाही, आम्ही परत लढू,' असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पुढे त्याने #Liger लिहिले आहे.
दरम्यान, IndiaToday.in ला विजयनं नुकतीच मुलाखत दिली होती. या मुलाखतीत विजयला बॉयकॉट ट्रेंडवर विचारण्यात आले होते. यावेळी विजय खुलेपणाने बोलला, 'मला वाटतं की चित्रपटाच्या सेटवर अभिनेते, दिग्दर्शक, अभिनेत्री यांच्याशिवाय इतरही अनेक महत्त्वाचे लोक आहेत. एका चित्रपटात 200-300 कलाकार काम करतात आणि आमच्या सर्वांचे स्टाफ मेंबर्सही असतात. त्यामुळे एक चित्रपट अनेकांना रोजगार देतो. बऱ्याच लोकांसाठी जगण्याचे हे एक साधन आहे.