अभिनेता विजय कदम यांचं अकाली निधन झालं आहे. कर्करोगाशी विजय कदम यांची झुंज अपयशी ठरली 10 ऑगस्ट रोजी त्यांचं निधन झालं आहे. जेष्ठ अभिनेता  विजय कदम यांचं आज सकाळी निधन झालं आहे. विजय कदम यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विजय कदम यांनी 80 आणि 90 च्या दशकामध्ये अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये विनोदी भूमिका निभावली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय कदम हे मराठी चित्रपट आणि नाट्यअभिनेते म्हणून लोकप्रिय होते.  त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून अभिनय केला आहे. 'टूरटूर', 'सही दे सही', 'विच्छा माझी पुरी करा', 'पप्पा सांगा कुणाचे' अश्या अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या आहेत. इ.स. 1980 ते 1990 च्या दशकात त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या. 


विजय कदम यांची लव्हस्टोरी


Vijay Kadam Love Story : अभिनेते विजय कदम ह्यांनी प्रेम विवाह केला असून त्यांची पत्नी देखील मराठी अभिनेत्री आहेत.  विजय कदम ह्यांच्या पत्नी पद्मश्री जोशी ह्या देखील ​प्रसिद्ध ​अभिनेत्री आहेत.​ 'नणंद भावजय', 'पोरीची धमाल बापाची कमाल', 'नवलकथा' या चित्रपटात पद्मश्री जोशी ह्यांनी अभिनय केला आहे.​ विजय कदम आणि पद्मश्री जोशी ह्यांनी ​भरपूर ​नाटकात एकत्रित कामे केली​, तेव्हाच विजय यांनी दोनदा ​मागणी घालूनही त्यांनी लग्नाला नकार दिला होता​,​ परंतु ​’विच्छा माझी पुरी करा​’ या नाटकातील विजय कदम यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे ​पद्मश्री स्वतःहून त्यांच्या प्रेमात पडल्या आणि आपला होकार कळ​विला. ​


पल्लवी जोशीसोबत खास कनेक्शन 


बऱ्याच कमी लोकांना हे माहित नाही, पण विजय कदम ह्यांच्या पत्नी पद्मश्री जोशी आणि पल्लवी जोशी ह्या ​सख्ख्या बहिणी आहेत. तसेच ​प्रसिद्ध ​संगीत शिक्षिका सुषमा जोशी या यांच्या आई. सुष​​मा जोशी ह्यांना दोन मुली पद्मश्री, पल्लवी आणि एक मुलगा मास्टर अलंकार. मास्टर अलंकार हे देखील एक उत्तम अभिनेते आहेत. पण ​सध्या ते अभिनयापासून दूर ​असून स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे. विजय चव्हाण ह्यांच्या पत्नीची बहीण ह्या नात्याने पल्लवी जोशी ह्या विजय कदम ह्यांच्या नात्याने मेव्हणी आहेत.