Maharaja movie : मक्कल सेल्वन विजय सेतुपतीचा 'महाराजा' हा 50 वा चित्रपट तामिळनाडूमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक म्हणून उदयास आला आणि VJS करिअरमधील विशेष चित्रपटांपैकी एक ठरला. चित्रपट रिलीज झाल्यापासून, चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षकांना भुरळ घातली आहे. 3 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ज्यामुळे संपूर्ण तामिळनाडूमध्ये या चित्रपटाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता विजय सेतुपतीचा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर OTT वरही प्रेक्षकांचा आवडता ठरला आहे.  हा चित्रपट आधी चित्रपटगृहात रीलिज झाला होता. मात्र, आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेंडिग चित्रपटांच्या यादीमध्ये हा चित्रपट टॉप 5 मध्ये आहे. 


'महाराजा'चं हिंदी रिमेक आमिर खान करणार


'महाराजा' हा चित्रपट पुन्हा एकदा हिंदी बॉलीवूड रिमेकसह प्रेक्षकांना आकर्षित करेल. हिंदी रिमेकचे हक्क आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊस आमिर खान प्रॉडक्शनने सुरक्षित केले आहेत. असा विश्वास आहे की,आमिर खान या बॉलीवुड थ्रिलरमध्ये आपला अनोखा ट्विस्ट जोडेल आणि एक आकर्षक चित्रपट बनवेल. 


आमिर खान केवळ या चित्रपटाची निर्मितीच नाही तर VJS ची भूमिकाही साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेता अमिर खान हा विजय सेतुपतीचा चाहता आहे. त्याच्या कामांचे बारकाईने पालन करतो. आमिर खानने लाल सिंग चड्डासाठी विजय सेतुपतीशी संपर्क देखील साधला होता. मात्र, हे अनेकांना माहिती नाही. पण तारखेच्या समस्यांमुळे तो त्याचा भाग होऊ शकला नाही. 



ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत महाराजाची बाजी


नेटफ्लिक्सच्या ग्लोबल चार्टमध्ये नॉन इंग्लिश कॅटेगरीमध्ये 'महाराजा' हा चित्रपट सगळ्यात ट्रेंडिंग चित्रपट आहे. चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट चौथ्या क्रमांकावर आहे. यामधूनच 'महाराजा' हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला आहे, असं सिद्ध होते. 


बॉक्स ऑफिसवर महाराजाचं कलेक्शन


विजय सेतुपतीचा महाराजा हा 50 वा चित्रपट आहे. तामिळनाडूमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक 'महाराजा' एक आहे. नेटफ्लिक्सवर आपली लोकप्रियता कायम ठेवत या चित्रपटाने आणखी एक कामगिरी केली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता पुढील काही दिवस हा चित्रपट ट्रेंडिंगमध्ये राहण्याची शक्यता आहे. या चित्रपटाने 71.26 कोटींची कमाई केली आहे. जागतिक स्तरावर या चित्रपटाने 104.84 कोटींची कमाई केली आहे.