Vijay Sethupathi on Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय सेतूपती हे दोघेही पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. ते दोघे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशात त्या दोघांनी नुकतीच एक कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी विजयनं त्याचं शाहरुख खानसोबत असलेलं नातं आणि त्याचसोबत त्याच्या क्रशविषयी एक खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख, विजय आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अॅटलीनं चेन्नईच्या श्री साईराम इंजिनिअरींग कॉलेजमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी या तिघांनी यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. विजयनं जवान या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटात खलनायक असून शाहरुख खानशी सूड घेताना दिसत आहे. दरम्यान, या सगळ्यात विजय जी मुलगी आवडत होती तिला तो प्रपोज न करू शकण्याचे कारण शाहरुख खान असल्याचे त्यानं खुलासा केला आहे. 



विजय या विषयी बोलताना म्हणाला, 'मी जेव्हा शाळेत होतो, तेव्हा मला एक मुलगी खूप आवडायची. पण तिला हे माहित नव्हतं. अखेर प्रत्येक जानूचा एक राम असतो. (विजय यावेळी त्याचा 2018 साली प्रदर्शित झालेल्या 96 या चित्रपटाविषयी बोलत असतो.) पण ती मुलगी ही शाहरुखच्या प्रेमात होती. त्या गोष्टीचा सुड घेण्यासाठी मला इतकी वर्षे लागली.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


विजयच्या या वक्तव्यानंतर शाहरुख म्हणाला, 'इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं तमिळमध्ये भाष्य केलं आणि मला विश्वास आहे की ते सगळं माझ्याविषयी चांगलंच बोलले असणार. शिवाय विजय सेतुपतीला सोडून. जो इथे एका मुलीविषयी बोलत होता. सर, मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला पाहिजे तितका सुड तुम्ही घेऊ शकता, पण माझ्या मुली नाही. त्या फक्त माझ्या आहेत.' 


हेही वाचा : Money Heist वेब सिरीजवरून प्रेरित आहे शाहरुखचा जवान? नेमका काय आहे प्रकार


दरम्यान, यावेळी अॅटलीनं देखील त्याचा एक अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला की 13 वर्षांपूर्वी त्यानं शाहरुखचं घर मन्नतसमोर एक फोटो काढला होता आणि आज त्याच्या घरात जाण्यासाठी मन्नतचे दरवारजे उघडल्याचे म्हटले आहे. अॅटली म्हणाला की, 'मी एक गोष्ट सांगतो, मी जेव्हा दिग्दर्शक शंकर यांच्यासोबत Enthiran साठी मुंबईत काम करत होतो. तेव्हा मला माझ्या मित्रानं सांगितलं की आपण शाहरुख खानच्या घराच्या समोर शूट करतोय. त्यानं मला मन्नतच्या गेट समोर उभे राहण्यास सांगितले. आता तब्बल 13 वर्षांनंतर तेच गेट आणि स्वत: शाहरुख खान स्वत: म्हणाला, 'अॅटली सर तुमचे स्वागत आहे.'