Sara Ali Khan and Vijay Varma Intimate Scene : आज 15 मार्च रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिग्दर्शक होमी अदजानिया यांचा ‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर जेव्हा पासून प्रदर्शित झाला तेव्हा पासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत होते. तर या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विजय वर्मा पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसत आहेत. त्यातही त्या दोघांमध्ये असलेल्या केमिस्ट्रीनं आणि त्यातही त्यांच्यातला इंटिमेट सीननं सगळ्यांचे लक्ष वेधले. आता विजयनं त्याच्या आणि सारामध्ये असलेल्या इंटिमेट सीनवर सांगत एक मोठा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा आणि विजयनं लहाणपणापासून प्रेमात असलेल्या कपलची भूमिका साकारली आहे. या मर्डर मिस्ट्रीमध्ये एकतर्फी प्रेमाविषयी देखील दाखवण्यात आलं आहे. विजयनं सारा अली खानसोबत इंटिमेट सीन आणि तिच्यासोबत पहिल्यांदा काम करण्यावर वक्तव्य केलं आहे. विजयनं सांगितलं की त्याच्यात आणि सारामध्ये दाखवण्यात आलेल्या केमिस्ट्रीच्या एकदम विरोधात आहेत. विजयनं म्हटलं की मोठ्या पडद्यावर हा खूप रोमान्स आहे, मात्र सेटवर सारा आणि मी एकदम वेगळे आहोत. आम्ही सतत एकमेकांसोबत मस्ती आणि मस्करी करायचो. त्यामुळे आमच्यात चांगली केमिस्ट्री असेल याची मी कल्पना किंवा अपेक्षा देखील केली नव्हती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


विजयनं यावेळी सेटवर झालेला एक किस्सा सांगितला, "सारा तिच्या भूमिकेत इतकी एकरुप झाली होती की तिनं त्याला खेचलं आणि एक हॉट सीन दिला." विजयनं पुढे सांगितलं की "तेव्हा त्याला या गोष्टीची जाणीव झाली की जेव्हा दोन कलाकार एकमेकांसोबत खूप फ्री किंवा त्यांचं एकमेकांसोबत असलेलं बॉन्ड हे चांगलं असते तेव्हा त्यांना कोणत्याच गोष्टीचा संकोच त्यांच्या मनात राहत नाही. त्यामुळे त्यांना त्यांची भूमिका साकारणं आणि ती केमिस्ट्री तशी ठेवणं सोपं होतं." 


विजय आणि सारामध्ये असलेली केमिस्ट्री दाखवण्यावर दिग्दर्शक होमी अदजानिया म्हणाले होते की "अशा दोन कलाकारांना ज्यांनी कधीच एकत्र स्क्रिन शेअर केली नाही त्यांना एकत्र आणणं फार कठीण आणि आव्हानात्मक असतं. कारण त्या दोघांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या केमिस्ट्रीवर काम करावं लागतं." 


हेही वाचा : 'मी तिच्याहून खूप चांगली आहे, लक्षात ठेवा'; कोणत्या अभिनेत्रीनं जया बच्चन यांच्यावर साधला निशाणा?


दरम्यान, ‘मर्डर मुबारक’ विषयी बोलायचे झाले तर सारा अली खान, करिश्मा कपूर, पंकज त्रिपाठी आणि विजय वर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर हा चित्रपट लहाणपणीच्या लव्हस्टोरीवर आणि त्यातही वनसाईड लव्ह स्टोरीविषयी आहे.