'मी तिच्याहून खूप चांगली आहे, लक्षात ठेवा'; कोणत्या अभिनेत्रीनं जया बच्चन यांच्यावर साधला निशाणा?

This Actress Takes dig at Jaya Bachchan : जया बच्चन यांच्यासोबत तुलना होऊ लागली हे पाहता अभिनेत्रीनं केलं स्पष्ट वक्तव्य.

दिक्षा पाटील | Updated: Mar 15, 2024, 11:52 AM IST
'मी तिच्याहून खूप चांगली आहे, लक्षात ठेवा'; कोणत्या अभिनेत्रीनं जया बच्चन यांच्यावर साधला निशाणा?
(Photo Credit : Social Media)

This Actress Takes dig at Jaya Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या त्याच्या रागीट स्वभावामुळे चर्चेत असतात. पापाराझींना पाहिल्यावर त्या किती चिडतात हे आपण अनेकदा पाहिलं आहे. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यामुळे ना फक्त जया बच्चन यांना नेटकरी ट्रोल करतात तर त्यांच्यात आता अभिनेत्री मौसमी चॅटर्जीचं देखील नाव समोर आलं आहे. त्यांनी देखील जया बच्चन यांच्या रागीट स्वभावावर प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर मौसमी चॅटर्जी यांना नुकतंच पापाराझींनी स्पॉट केलं. तेव्हा मौसमी पापाराझींवर चिडल्या. त्यानंतर एका मित्रानं त्यांची तुलना जया बच्चन यांच्यासोबत केली. हे कळताच मौसमी यांनी जया बच्चन यांच्यावर कमेंट केली आहे. 

खरंतर मौसमी चॅटर्जी या एका कार्यक्रमात दिसल्या. त्यावेळी पापाराझी कधी इथे तर कधी तिथे असे पोज देण्यासाठी सांगत होते. तेव्हा मौसमी चॅटर्जी आधी हसल्या आणि मग त्या थोड्यावेळात चिडल्या. मात्र, त्यांनी कसं तरी स्वत: ला सांभाळलं. मौसमी चॅटर्जी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर नमस्ते बॉलिवूड डॉट इननं शेअर केला आहे. या व्हिडीओत मौसमी बोलताना दिसत आहेत की मी जया बच्चन पेक्षा खूप चांगली आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही नसता तर आम्ही कुठे असतो? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जया बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्या दोघींचं पटायचं नाही. एका मुलाखतीत मौसमी चॅटर्जी यांनी सांगितलं की गुलजार यांच्या कोशिश चित्रपटात जया बच्चन यांनी रिप्लेस केलं. मौसमीनं सांगितलं की त्यांनी चित्रपटासाठी तीनपर्यंत शूटिंग केलं. मात्र, त्यांनी पाहिलं तर जया बच्चन यांची सेक्रेटरी सगकाळपासून रात्री पर्यंत रहायची आणि एक दिवस अचानक गुलजार यांनी मौसमी चॅटर्जी यांनी चित्रपटातून रिप्लेस केलं. 

हेही वाचा : आलिया भट्टची एकूण संपत्ती किती माहितीये?

जया बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांच्याविषयी बोलायचे झाले तर जया बच्चन आताही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात जया बच्चन दिसल्या होता. तर त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेची प्रेक्षकांनी स्तुती केली होती. मात्र, मौसमी चॅटर्जी या 2013 पासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहेत. मात्र, त्या काही कार्यक्रमांमध्ये दिसतात. गेल्या वर्षी त्या 'इंडियाज बेस्ट डांसर-3' मध्ये पाहुण्या म्हणून पोहोचल्या होत्या. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x