Vikas Sethi Wife On His Death : छोट्या पडद्यावरील अभिनेता विकास सेठीच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. शनिवारी रात्री झोपेत त्याला कार्डियॅक अरेस्ट आला ज्यामुळे त्याचे निधन झाले. सोमवारी म्हणजे आज 9 सप्टेंबर रोजी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यात त्याची पत्नी जान्हवी कपूरनं सांगितलं की सगळ्यात शेवटी त्याच्यासोबत काय झालं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकास सेठीची पत्नी जान्हवी सेठीनं 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्याच्यासोबत नक्की काय झालं होतं. जान्हवीनं सांगितलं की 'मी त्याच्यासोबत माझ्या आईच्या नाशिकच्या घरी पोहोचले. त्याला उल्ट्या आणि जुलाब होऊ लागले. त्याला रुग्णालयात जायचं नव्हतं. तर आम्ही डॉक्टरांना घरी बोलावलं. रविवारी सकाळी जवळपास 6 वाजता जेव्हा मी त्याला उठवण्यासाठी गेले तेव्हा त्याचं निधन झालं होतं. तर डॉक्टरांनी सांगितलं की तो झोपलेला असताना त्याला कार्डियॅक अरेस्ट आला आणि त्यानं त्याचे निधन झाले.'



जान्हवीनं सांगितलं की विकासच्या पार्थिव मुंबईच्या कूपर रुग्णालयात पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आलं होतं. जान्हवीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली की आम्ही अत्यंत दु:खाने कळवत आहोत की 8 सप्टेंबर 2024 रोजी आम्हाला एकटं सोडून गेलेल्या आमच्या विकास सेठीचं निधन झालं. 9 सप्टेंबर रोजी हिंदू परंपरेनुसार, त्याच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या कठीण काळात आम्ही तुमची उपस्थिती, प्रार्थना आणि समर्थनाची अपेक्षा करतो.


हेही वाचा : अभिनेत्रीचा 'लाफ्टर शेफ'मध्ये अपघात! चेहरा भाजला; म्हणाली, 'अल्लाहचे आभार नाहीतर माझं...'


दरम्यान, विकासच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यानं सास भी कभी बहू थी, कहीं तो होगा आणि ससुराल सिमर या मालिकांमध्ये काम केलं आहे. कभी खुशी कभी गम या चित्रपटात त्यानं करीना कपूरसोबत काम केलं होतं. या चित्रपटात त्याची पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. 


कोण आहे विकास सेठीची पत्नी?


विकास सेठीची पत्नीच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलविषयी बोलायचे झाले तर ती एक एन्टप्रेन्योर आहे. ती माय जिंदगी नावाच्या एका मेंटल हेल्थ फाऊंडेशनशी जोडलेली आहे. ती स्वत: एक सायकॉलॉजिस्ट आहे. त्यासोबत ती होमफेश देखील आहे. सोशल मीडियावर फूड ब्लॉग्स शेअर करत असते.