अभिनेत्रीचा 'लाफ्टर शेफ'मध्ये अपघात! चेहरा भाजला; म्हणाली, 'अल्लाहचे आभार नाहीतर माझं...'

Actress Injured in Laughter Chefs Show : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला खुलासा... 

दिक्षा पाटील | Updated: Sep 9, 2024, 10:47 AM IST
अभिनेत्रीचा 'लाफ्टर शेफ'मध्ये अपघात! चेहरा भाजला; म्हणाली, 'अल्लाहचे आभार नाहीतर माझं...' title=
(Photo Credit : Social Media)

Actress Injured in Laughter Chefs Show : छोट्या पडद्यावरील 'लाफ्टर शेफ' या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात 6 जोड्या बनवण्यात आल्या असून त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ यावेळी बनवताना दिसतात. या दरम्यान, ते मस्ती करतात आणि त्यांच्यातील मज्जा तुम्हालाही पाहायला मिळते. या शोचं सुत्रसंचालन कॉमेडी क्वीन भारती सिंग करते. तर शेफ हरपाल सिंग हे या शोचे परिक्षक आहेत. 

शोमध्ये दिसणाऱ्या जोडप्यांविषयी बोलायचे झाले तर यात कृष्णा अभिषेक-कश्मीर शाह, निया शर्मा-सुदेश लहरी, जन्नत जुबैर-रीम शेख, अंकिता लोखंडे-विकी जैन, अर्जुन बिजलानी-करण कुंद्रा आणि अली गोनी-राहुल वैद्द आहेत. नुकताच या शोच्या सेटवर रीम शेखसोबत अपघात झाला आहे. ज्याविषयी तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं. तिनं तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात तिचा चेहरा हा भाजल्याचे दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

22 वर्षांच्या रीम शेखनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करत तिनं काही फोटो शेअर केले आहेत. त्या पोस्टमध्ये रीमनं कॅप्शन दिलं की 3 सप्टेंबर 2024 रोजी माझ्यासोबत एक अपघात झाला. पण देवाच्या कृपेनं मी अशा दुर्घटनेतून बचावले, जी माझं आयुष्य बदलू शकत होतं. चमत्कार काय असतो... तुमच्या आवडीचं चॉकलेट तुमच्या समोर असून तुमच्या हातात येत नाही. तर हे देवानं काही तरी ठरवलेलं असतं. 

त्यासोबत पुढे रीमनं सांगितलं की दुसऱ्या दिवशी तिचा वाढदिवस असताना, त्याचे फोटो देखील तिनं शेअर केले आहेत. रीमनं हे सांगितलं नसेल की त्यांच्यासोबत नक्की काय झालं आणि केव्हा झालं. पण तिचा चेहरा पाहून असं वाटलं की तिच्या चेहऱ्यावर तेलाचे थेंब उडाले आहेत. त्यामुळेच ती भाजली. हे शक्य आहे की 'लाफ्टर शेफ' च्या सेटवरच हे होऊ शकतं. कारण त्याच शोमध्ये जेवण बनवण्याचा टास्क देण्यात येतो. 

दरम्यान, रीमनं काल 8 सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरी केला आहे. त्याचे फोटो देखील तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात तिचा चेहरा हा स्पष्ट दिसतोय.