मुंबई : सध्या कतरिना कैफसोबत विकी कौशलच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत. दोघेही लवकरच लग्न करू शकतात, मात्र याबाबत त्यांनी कोणतीही पुष्टी केलेली नाही. कतरिनाच्या आधी विकीच्या आयुष्यात एक खास व्यक्ती होती. पण त्यांचं ब्रेकअप कधी झालं आणि दुसरीकडे विकीचं कतरिनासोबत कधी जुळलं याबद्दल कोणालाही कळालं नाही. विकीच्या एक्स गर्लफ्रेन्डचं नाव हरलीन सेठी असं आहे. हरलिन देखील अत्यंत हॉट आणि बोल्ड आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विकी कौशल आणि हरलिन सेठी यांचे नाते 2019 पर्यंत घट्ट होते. विकीच्या 'उरी' चित्रपटाच्या वेळीही हरलीन जोरदार प्रमोशन करताना दिसली. मात्र, 'उरी'नंतर जेव्हा विकीने यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली, तेव्हा हरलीन आणि त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. 



ब्रेकअपनंतर हरलिनने विकीला सोशल मीडियावर अनफॉलो केले आणि त्यांच्या ब्रेकअपशी संबंधित एक नोट सोशल मीडियावर शेअर केली. त्यांच्या ब्रेकअपनंतर चर्चांना उधाण आलं. 


विकी कौशलची एक्स गर्लफ्रेन्ड हरलिन शेठीने सांगितले की, विकीने त्यांच्या नात्यातील रंग अचानक बदलला, त्यामुळेच आमचे ब्रेकअप झाले आणि ‘संजू’ आणि ‘उरी’च्या यशानंतर विकी पूर्णपणे बदलला. पण ही सर्व भूतकाळातील गोष्ट आहे'.  



हरलिनचा प्रवास फक्त बॉलिवूड पुरता मर्यादित नाही, तर तिने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. हरलिन कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.