Vikram Bhatt Chronic Disease : अनेकदा सेलिब्रिटी त्यांच्या तब्येतीबाबत धक्कादायक खुलासे करत असतात. काहि दिवसांपूर्वी वरुण धवन ( Varun Dhawan ) आणि सामंथाने (Samantha Ruth Prabhu) गंभीर आजारांना झुंज देत असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. सामंथाने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत  मायोसिटिस या आजाराबद्दल सांगितलं होतं. या सगळ्यानंतर फिल्ममेकर विक्रम भट्ट यांनी आपल्या आजाराबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामंथाकडून प्रेरणा मिळाली 

विक्रम यांनी मीडियासोबत बोलताना खुलासा केला की, ते फाइब्रोमायल्जिया नावाच्या एका गंभीर आजाराला झुंज देत आहेत. फिल्ममेकर यांनी पुढे सांगितलं की, मला साऊथ अभिनेत्री सामंथाकडून प्रेरणा मिळाली आहे. या दुर्मिळ आजारामध्ये मांसपेशी कमी होतात आणि खूप वेदना होतात याचबरोबर थकवा, झोप, विसरभोळेपणा आणि मूडस्विंग्स सारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो.


18 वर्षांपासून आजाराशी लढतायेत विक्रम भट्ट

मीडियासोबत बोलताना विक्रम भट्ट यांनी सांगितलं की, ''मी गेली १८ वर्ष खूप हैराण आहे. सामंथाच्या आजारामध्ये मायोसिटिस मांसपेशी कमी होतात आणि माझ्या केसमध्ये फाइब्रोमायल्जियामधून मांसपेशिंमध्ये खूप वेदना होतात. तुमच्या वेदनांना वेगळ्याप्रकारे प्रोसेस करतं. जी वेदना सामान्य माणसाला होऊ शकत नाही ती माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे. यापैकी कोणत्याही आजारावर इलाज नाही. केवळ ध्यान किंवा चांगली झोप यासारख्या आध्यात्मिक गोष्टी मदत करू शकतात.


 आजारामुळे सगळं संपल होतं

विक्रम यांनी पुढे सांगितलं की, मी भाग्यवान आहे की, माझ्याकडे एक चांगली सपोर्ट सिस्टीम आहे, मात्र हे खूप कठिण आहे. या आजाराने माझ्याकडून खूप काही हिरावून घेतलं आहे मात्र तरिही या आजाराने मला बरचं काही शिकवलं आहे मला खूप मजबूत बनवलं आहे. मी सामथांपर्यंत पोहचू ईच्छितो आणि तिला सांगू ईच्छितो की, जर मी यामधून सावरु शकलो. तर तुम्ही देखील यामधून सावरु शकता. याचा मला खूप आनंद आहे की, वेदनांशी लढण्यासाठी जितकी ताकद लागते तितकी लपण्यासाठीही लागते.


हेल्थ सिचुएशन  हाताळण्यास दोन कवितांनी केली मदत

अध्यात्माच्या पलीकडे आणि उत्तम जीवनशैलीच्या पलीकडे, काही चांगलं लेखन होतं ज्यामुळे विक्रम यांना यामधून बाहेर पडण्यास मदत झाली.  ''दोन कविता होत्या ज्यांनी मला या आरोग्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी खूप मदत केली. एक हरिवंशराय बच्चन यांची अग्निपथ आणि दुसरी इन्व्हिक्टस ही कविता ज्याने नेल्सन मंडेला यांना तुरुंगात जिवंत ठेवलं होतं. ते नुसते जगले नाही तर त्यांना आशा आणि जिद्द दिली. या कविता मला मनापासून माहीत आहेत.'' असं ते म्हणाले.