मुंबई : कलाविश्वात कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडण्यात येईल सांगता येत नाही. सध्या अभिनेत्री सुष्मिता सेन आणि उद्योगपती  ललित मोदी यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. सुष्मिता ललित मोदीसोबत फक्त पैशांसाठी रिलेशनशिपमध्ये आहे... असं म्हणत अभिनेत्रीला 'गोल्ड डिगर' म्हणून हिणवण्यात आलं. यावर सुष्मिताने ट्रोलर्सला उत्तर देखील दिलं. आता या प्रकरणात सुष्मिताच्या पहिल्या बॉयफ्रेंडने उडी घेतली आहे. अभिनेत्रीच्या पहिल्या बॉयफ्रेंडने त्यांच्या काही जुन्या आठवणी यावेळी सांगितल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत अनेकांसोबत सुष्मिताच्या नावाची चर्चा झाली. त्यामधील एक म्हणजे, विक्रम भट्ट. सध्या सुष्मिता उद्योगपती ललित मोदीसोबत असलेल्या नात्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यामुळे अभिनेत्रीचा पहिला बॉयफ्रेंड विक्रम भट्टही सुष्मिताच्या समर्थनार्थ पुढे आला असून त्याने ट्रोल करणाऱ्यांना फटकारले आहे.



विक्रम भट्ट म्हणाला, 'सुष्मिता ही शेवटची व्यक्ती असेल जी प्रेमात पडण्यापूर्वी कोणाचा तरी बँक बॅलन्स तपासत असेल. एके काळी माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी त्या वेळी 'गुलाम' सिनेमाच दिग्दर्शन करत होतो. मला अमेरिकेला घेऊन जाणारी सुष्मिता ही पहिली व्यक्ती होती. एवढंच नाही तर माझा संपूर्ण खर्च देखील तिने केला'



तो पुढे म्हणाला, 'सुष्मिता गोल्ड डिगर नाही तर, लव्ह डिगर आहे. लोकांसाठी दुसऱ्याच्या आयुष्याची चेष्टा करणे हे मनोरंजन आहे. स्टार्ससोबत असे नेहमीच घडलं आहे, कोणत्याही स्टारने आपल्या आयुष्याचा कोणताही निर्णय घेतला तर तो लोकांसाठी चेष्टेचा विषय असतो.'


सध्या सर्वत्र सुष्मिताच्या नात्याविषयी चर्चा रंगत आहेत. ललित मोदी आधी सुष्मिताने रणदीप हुड्डा, ऋतिक भसीन, सबीर भाटिया, वसीम अकरम आणि रोहमन शॉल यांना देखील डेट केलं आहे.