Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या अभिनय, फॅशन सेन्स आणि त्यासोबत त्याच्या एनर्जीसाठी ओळखला जातो. रणवीरनं आजवर वेगवेगळ्या धाटनीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या भूमिका साकारताना तो त्यासाठी जे काही करता ते सगळं करतो. अनेकदा त्यामुळे तो बराचवेळा त्यात गुंतून राहतो. याविषयी दीपिकानं देखील एका मुलाखतीत सांगितलं होतं. असाच काहीसा खुलासा हा दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांनी केला होता की रणवीर हा त्याच्या भूमिकेसाठी कोणतीही हद्द पार करण्यासाठी तयार असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रमादित्य मोटवानीनं 'मॅशएबल इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की रणवीर सिंग जेव्हा कोणती भूमिका साकारतो तेव्हा त्यासाठी तो कोणतीही जोखीम घेण्यास तयार असतो. ‘लुटेरा’ या चित्रपटातील एक किस्सा सांगत ते म्हणाले की चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणवीर सिंगच्या कंबरेला दुखापत झाली होती. पण तरी एका योद्धयाप्रमाणे त्यानं त्रास सहण करत शूटिंग पूर्ण केली. 


विक्रमादित्य पुढे म्हणाले, 'पुढच्या दिवशी, जो सीन शूट करत होता तेव्हा रणवीरला त्याच्या पोटातून एक गोळी काढायचा सीन होता. जी वेदना आहे त्याला अनुभवण्यासाठी आणि त्याचा परफॉर्मन्सला हुबेहुब तसंच दाखवण्यासाठी त्यानं त्याच्या कमरेला पेपर क्लिप लावली आणि जंगलाज धावत होता जेणेकरून जेव्हा शूट करणार तेव्हा चेहऱ्यावर घाम देखील असेल. त्याला त्या भूमिकेला होणारी वेदना जगायची होती त्यासाठी त्यानं खूप मेहनत केली होती.' 


विक्रमादित्य पुढे म्हणाले, 'पोटावर पेपर क्लिप असल्यानं रणवीर सिंगला त्याच्या कंबरेला किती त्रास होतोय हे जाणवत नव्हतं पण त्यानं ती क्लिप काढल्यानंतर त्याला वेदनेची जाणीव झाली. त्यानंतर त्याची वेदना इतकी वाढली की रणवीर सिंग डलहाउजीवरून एअरलिफ्ट करण्यात आलं.' या चित्रपटात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा दिसली होती. 


हेही वाचा : 'मला भीती वाटत होती की...', विद्यानं सांगितलं 'भूल भुलैया 2' नाकारण्यामागील खरं कारण


रणवीर सिंगविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या कॉप युनिव्हर्समध्ये त्याची इन्स्पेक्टर संग्राम भालेराव ही भूमिका होती.