मुंबई : बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या स्टार कलाकाराने नुकतचं लग्न उरकलं आहे. वेबविश्वात आपली वेगळी छाप पाडणारा हा अभिनेता आता अखेर शीतल ठाकूर हिच्या सोबत लग्न बंधनात अडकला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. 'लाखों दिलो की धडकन' असं वर्णन या अभिनेत्याचं केलं तर वावगं ठरणार नाही. त्याने काही लोकांच्या उपस्थित गुपचुप लग्न केलं असलं तरी आता फोटो व्हायरल होत आहेत.


अभिनेता विक्रांत मैसी आणि शीतल ठाकूर यांनी लग्न केले आहे. विक्रांत आणि शीतलच्या लग्नाचे फोटो आता सतत चर्चेत आहेत. अनेक दिवसांपासून चाहते विक्रांत आणि शीतलच्या लग्नाची वाट पाहत होते.



आणि आता चाहत्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. चाहते विक्रांत- शीतलच्या फोटो-व्हिडिओवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तर काही मुलीचं हृदय तुटलं आहे. कारण त्यांच्या लाडक्या अभिनेत्याने आता आपली लाईफ पार्टनर निवडली आहे आणि ते अधिकृत रित्या जाहीर केलं आहे.



विक्रांत मैसी आणि शीतलच्या लग्नाचे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत. फोटोंमध्ये शीतल लाल रंगाच्या  ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, तर दुसरीकडे विक्रांतही शेरवानीमध्ये सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहे.