PM Modi Will Watch Vikrant Massey Movies The Sabarmati Report : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा स्पीकर ओम बिडला आज 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट पाहणार आहेत. बॉलिवूड अभिनेता विक्रांत मैसीनं याच चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. विक्रांत मेसीच्या या चित्रपटाची स्क्रिनिंग आज संध्याकाळी 4 वाजता योगी ऑडिटोरियममध्ये होणार आहे. हे सभागृह संसद भवनाच्या आवारातच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा चित्रपट 2002 च्या गोधरा प्रकरणावर आधारित आहे. यावेळी गुजरातच्या गोधरा स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसला आग लागल्याची घटना झाली होती. या घटनेत अयोध्यावरून परतत असणारे 59 कारसेवकांचे निधन झाले. त्यानंतर राज्यात मोठ्या दंगली झाल्या आणि त्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला. जेव्हा ही घटना घडली होती त्यानंतर संपूर्ण जग हे हादरलं होतं. हा चित्रपट आज पंतप्रधान मोदी पाहणार आहेत. 



या चित्रपटात विक्रांत मेसीनं एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. दरम्यान, आज विक्रांतनं एक पोस्ट शेअर करत त्याच्या रिटायरमेंटची घोषणा केली आहे. त्यानं शेअर केलेल्या या पोस्टनं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर विक्रांत मेसीसोबत या चित्रपटात रिद्धि डोगरा आणि राशि खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, चित्रपट जवळपास 50 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.