Vikrant Massey : अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचं कुटुंब हे सगळ्या धर्मावर विश्वास ठेवतात. त्या मागचं कारण असून शकतं. असंच एक कुटुंब आहे. त्या अभिनेत्याचे वडील हे ख्रिश्चन आहेत. आई शीख आहे. भाऊ मुस्लिम आहे. या कुटुंबात वेगवेगळ्या धर्मातील लोक कसे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आपण त्याच विषयी जाणून घेणार आहोत. नेमका हा कोणता अभिनेता आहे ज्याच्या कुटुंबात सगळे वेगवेगळ्या धर्माचे आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अभिनेता दुसरा कोणी नसून अभिनेता विक्रांत मैसी आहे. जो वेगवेगळ्या धर्माच्या कुटुंबातून येतो. विक्रांतनं याविषयी स्वत: सांगितलं होतं. विक्रांतनं सांगितलं होतं की त्याची आई ही शीख धर्माची आहे. वडील ख्रिश्चन आहेत. भाऊ मुस्लिम आहे आणि त्याची पत्नी हिंदू आहे. 'अनफिल्टर्ड बाय समदीश' च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये विक्रांतनं हा खुलासा केला होता. त्यावेळी विक्रांतनं सांगितलं की मोठं होत असताना त्यानं धर्म आणि आध्यात्मिकतेवर अनेक वाद ऐकले आहेत. विक्रांतनं त्याच्या भावाविषयी बोलत असताना सांगितलं की त्याचं नाव मोइन आहे. त्यानं सांगितलं की त्याच्या भावानं मुस्लिम धर्म स्वीकारला आहे आणि त्यामुळे त्याचं नाव मोइन ठेवण्यात आलं आहे. विक्रांतनं हे देखील सांगितलं की त्याच्या कुटुंबानं मोइनच्या धर्म परिवर्तनाला स्वीकारलं आहे. 


विक्रांतनं सांगितलं की त्याच्या आई-वडिलांनी त्याला शिकवलं की जर तुमचं समाधान होत असेल तर तुम्हाला ज्या धर्मात हवं त्या धर्मात राहू शकतात. त्यानं सांगितलं की त्याच्या भावानं 17 वर्षाचा असताना धर्म परिवर्तन केलं होतं. विक्रांतनं हे देखील सांगितलं होतं की त्याचे वडील हे ख्रिश्चन आहेत त्यामुळे ते आठवड्यातून दोन वेळा चर्चमध्ये जातात. विक्रांतच्या वडिलांना नातेवाईकांनी धर्म परिवर्तनाविषयी विचारलं होतं आणि त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं की, जर त्यांचा मुलगा त्यांना सांगतो तर तो त्याला ज्या धर्मात हवं, त्या धर्मात जाऊ शकतो. त्याला त्याचा अधिकार आहे. 


विक्रांतनं शीतल ठाकुरशी लग्न केलं. तर त्या दोघांनी त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं आहे. तर त्यांनी सांगितलं की तो हिंदू परंपरेनं त्या मुलाचं संगोपन करणार आहेत आणि त्याच्या पत्नीच्या इच्छेचा सन्मान करणार आहेत. विक्रांतनं सांगितलं की एकच धर्म असणं गरजेचं नाही. आपल्या देशात जास्त लोकं दिवाळी आणि इतर हिंदू सण साजरा करतात आणि ते देखील असंच करतात. 


हेही वाचा : महेंद्र बाहुबली पुन्हा येतोय! तिसऱ्या चित्रपटावर काम सुरू... प्रसिद्ध निर्मात्यानं केलं कन्फर्म


विक्रांतनं सांगितलं की दिवाळी साजरा करण्यासाठी कोणताही धर्माची गरज भासत नाही. पण, त्यांनी हे देखील सांगितलं की लक्ष्मी देवीची पूजा केल्यानं धनलाभ होतो यावर माझा विश्वास नाही. पण विक्रांतनं सांगितलं तो त्याच्या वडिलांसोबत दोन वेळा चर्चेत जातो आणि आई आणि पत्नीसोबत पूजा करतो. त्यानं सांगितलं की त्याच्या घरात सगळ्या धर्मांसाठी स्थान आहे.