`भारतात मुस्लिम धोक्यात नाही, सगळं काही...`; विक्रांत मैसीच्या विधानाची सर्वत्र चर्चा! म्हणाला, `मागील 10 वर्षात...`
Vikrat Massey Says Muslims Are Safe in India : विक्रांत मैसीत्या
Vikrat Massey Says Muslims Are Safe in India : बॉलिवूड अभिनेता विक्रांत मैसी हा गेल्या काही दिवसांपासून त्याचा 'द साबरमती रिपोर्ट'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या विक्रांतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुस्लिम किंवा हिंदू भारतात धोक्यात आहेत असं मला वाटत नाही, असं वक्तव्य विक्रांत मैसीनं केलं आहे. त्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
शुभांकर मिश्राला दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये विक्रांतनं सांगितलं, 'ज्या गोष्टींचं आधी मला वाईट वाटायचं, त्या गोष्टी खरंतर माझ्या नजरेतून वाईट नाहीत. ज्या गोष्टी मला दुसऱ्यांमध्ये चांगल्या वाटायच्या, त्या खऱ्या आयुष्यात इतक्या चांगल्या नाहीत. सतत विकसित होणाऱ्या लोकांपैकीच मी एक आहे. आज मला वाटतं की हे इतकं चांगलं नाही. लोक म्हणतात की हिंदू धोक्यात आहेत, मला वाटत नाही की ते धोक्यात आहेत. लोक म्हणतात की मुस्लिम धोक्यात आहेत, कोणीच धोक्यात नाही. सगळं काही ठीक सुरु आहे.'
विक्रांत पुढे म्हणाला की 'जगात राहण्यासाठी सगळ्यात चांगला देश हा भारत आहे. यूरोप, फ्रांस, अमेरिकेला जा, तुम्ही तिथे पाहाल की काय होतंय. आता राहण्या जोगा देश कोणता असेल तर हाच आहे. हा एकमेव देश आहे जो जगाचं भविष्य आहे.' त्यानं सांगितलं की 'मी भाजपचा खूप मोठा टीका करणारा होतो. पण देशात फिरल्यानंतर मला या गोष्टीची जाणीव झाली की सगळं इतकं वाईट नाही. देशात मुस्लिम धोक्यात नाही. मागिल 10 वर्षात देशात बरचं काही बदललं आहे, त्याप्रमाणे माझं मत देखील बदललं आहे.'
हेही वाचा : 'त्या सुंदर आठवणी आता वाईट स्वप्न झालं; मुकेश खन्ना यांना पुन्हा 'शक्तिमान'च्या भूमिकेत पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
दरम्यान, विक्रांत मैसीनं केलेली टीका नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली नाही. नेटकऱ्यांनी दावा केला आहे की 'त्याचे बदललेले विचार ही त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असलेला प्रयत्न आहे.' तर काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की 'तू जे बोलतोय ते योग्य बोलतोय, कारण कलाकारांची जात नसते, ते दोन्ही बाजून बोलतात.' विक्रांतच्या कामाविषयी बोलायचं झालं तर 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटात विक्रांतसोबत मैसीशिवाय राशी खन्ना आणि रिद्धि डोगरा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.