Mukesh Khanna Trolled Over Shaktiman Role : मुकेश खन्ना हे त्यांच्या आयकॉनिक अशा शक्तिमान या भूमिकेसाठी ओळखले जातात. ते स्वत: आणि त्यांचे चाहते देखील या भूमिकेला आजही आठवतात. आता मुकेश खन्ना पुन्हा एकदा शक्मिमान या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, या चित्रपटातील एक व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांचे चाहतेच त्यांना ट्रोल करत आहेत.
खरंतर मुकेश खन्ना ही इंडियन सुपरहीरो म्हणून घरा-घरात पोहोचले. या मालिकेवर जेव्हा चित्रपट येणार असं म्हटलं जातं होते तेव्हा त्यात रणवीर सिंग हा शक्तिमानच्या भूमिकेत दिसतील असं म्हटलं. मुकेश खन्ना यांना शक्तिमानच्या भूमिकेत रणवीर सिंग नको होता. त्यांचं म्हणणं होतं की शक्मितानची भूमिका अशा अभिनेत्यानं साकारायला हवी जो त्या भूमिकेला न्याय देईल. मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंगला या भूमिकेसाठी नकार देण्याचं कारण त्याचं न्यूड फोटोशूट होतं. दरम्यान, आता स्वत: मुकेश खन्ना यांनी घोषणा केली की ते 'शक्तिमान' या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
हेही वाचा : सेलिब्रिटी मायलेकीतील वाद न्यायालयात; रुपाली गांगुलीनं सावत्र मुलीवर ठोकला 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा
मुकेश खन्ना यांनी शेअर केलेल्या काही पोस्ट आणि व्हिडीओमध्ये ते शक्तिमानच्या भूमिकेत दिसून येत आहेत. दरम्यान, 90 च्या दशकात ज्या मुलांनी 'शक्तिमान' ही मालिका पाहिली आहे. ते हे सगळं पाहून आनंदी नाहीत. त्यांनी यावरून मुकेश खन्ना यांना ट्रोल केलं असून काही सल्ले दिले आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'थोडा विचार करा जर त्याच्यात आणि खलनायकात फाईट सीन झाला तर शक्तिमान हा मॅक्स रुग्णालयात दिसेल.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'शक्तिमानला खराब करु नका.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अरे हा अजून भूतकाळात अडकला आहे. कोणीतरी त्याला यातून बाहेर काढा.' आणखी एक नेटकरी म्हणाला की 'शक्तिमानची खिल्ली उडवत आहात. आता दुसऱ्या कोणाला येण्याची संधी द्या.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आता या सगळ्यातून पुढे जाण्याची वेळ आली आहे. तो पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारू शकत होता किंवा अशी भूमिका जी वेळो-वेळी शक्तिमानला सल्ला देत आहे.' अशा विविध कमेंट करत नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांची त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
|
BOT
(20 ov) 114/7
|
VS |
LES
30(10.3 ov)
|
| Botswana beat Lesotho by 84 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
(14.3 ov) 91
|
VS |
SA
93/3(16.4 ov)
|
| South Africa beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.