नवी दिल्ली : ऑस्करसाठी आसामी सिनेमा 'व्हिलेज रॉकस्टार' या चित्रपटाची निवड करण्यात आलीय. भारतातर्फे या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलीय. ऑस्करसाठी देशभरातून २९ चित्रपट आले होते. या चित्रपटांतून 'व्हिलेज रॉकस्टार'ची ऑस्करसाठी निवड करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच, प्रदर्शित झालेल्या मंटो, संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत, आलिया भट्टचा राजी यांसारख्या तब्बल 28 सिनेमांना मागे टाकत 'व्हिलेज रॉकस्टार'नं ऑस्करमध्ये आपली जागा पक्की केलीय. 


दिग्दर्शक रीमा दास यांच्या 'व्हिलेज रॉकस्टार'नं राष्ट्रीय पुरस्कारही पटकावलाय. येत्या वर्षात दिल्या जाणाऱ्या 91 व्या अॅकेडम अवॉर्डसमध्ये (ऑस्कर) भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या सिनेमाची निवड करण्यात आलीय. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं ही घोषणा केलीय. 


 'व्हिलेज रॉकस्टार'

'व्हिलेज रॉकस्टार' या आसामी भाषेत बनलेल्या या सिनेमात गरिब पण अद्भूत अशा मुलांचं आयुष्य चित्रित करण्यात आलंय. या सिनेमाचं वर्ल्ड प्रिमिअर टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टव्हिल 2017 मध्ये पार पडलं होतं. आत्तापर्यंत 70 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांत हा सिनेमा दाखवण्यात आलाय. 


हिंदीमधले पद्मावत, राझी, ऑक्टोबर, लव्ह सोनिया, मंटो, पॅडमॅन, 102 नॉटआऊट तर मराठीमधले बोगदा, न्यूड, गुलाबजाम यांसारखे 28 सिनेमे या स्पर्धेत होते.