मुंबई : मल्याळम सिनेमा उरु अदार लव (Oru Adaar Love)मधून आपल्या करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरिअर व्हायरल गर्ल म्हणून प्रसिद्धझोतात आली. सिनेमा प्रदर्शनापूर्वीच व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ती लोकप्रिय झाली. तरुणाईला तिचे इतके क्रेझ आहे की तिचे व्हिडिओ झटपट व्हायरल होतात. तिचे अनेक व्हिडिओनंतर पुन्हा एकदा गाणे गातानाचा तिचा व्हिडिओ समोर आला आहे.


प्रियाचा पारंपारिक लूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ कोणाच्यातरी लग्नात शूट केला आहे. या व्हिडिओत प्रियाने साडी नेसली आहे आणि आपल्या फ्रेंड्ससोबत हवा हवा ऐ हवा हे गाणे गात आहे. हा व्हिडिओ Movie Man Broadcasting नावाच्या युट्युब चॅनलवरुन ३० एप्रिलला अपलोड करण्यात आला आहे आणि आतापर्यंत त्या व्हिडिओला 188,111 व्यूज मिळाले आहेत. पहा व्हायलर गर्लचा हा व्हिडिओ...



यातून प्रिया कमावते बक्कळ पैसा


मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रिया प्रकाशचे व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर तिच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या ५० लाखांहुन अधिक झाली आहे. त्याचबरोबर तिने ब्रॅंडचे प्रमोशनही सुरु केले असून त्यातून ती बक्कळ पैसा कमावते आहे.