मुंबई : रील व्हिडिओचा ट्रेंड सुरु झाला आहे. इन्स्टाग्राम, फेसबुकसह प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील व्हिडिओ मोठ्या प्रमामात पाहिले जातात. यामध्ये लोक ट्रेंडिंग विषयांवर व्हिडिओ बनवून व्हिडिओ अपलोड करतात. याशिवाय देशी, परदेशी आणि प्रादेशिक भाषांमध्येही रील व्हिडिओ बनवले जातात. याच क्रमात एक रील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये एक अतिशय सुंदर मुलगी 'छम्मा-छम्मा' या बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे, ज्याला युजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. हे गाणे चायना गेट चित्रपटातील आहे. या गाण्यावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने डान्स केला होता. तर, हे गाणे पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांनी गायले आहे. हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता.


ब्रिटिश एअरवेजमध्ये काम करणाऱ्या एअर होस्टेस उमा मिनाक्षीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पांढर्‍या स्नीकर्ससह काळ्या रंगाचा टॉप आणि हिरवा स्कर्ट परिधान करून उमा टेरेसवर नाचताना दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 30 हजार लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर युजर्सनी कमेंट करून रील व्हिडिओचे कौतुक केले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by UMA MEENAKSHI (@yamtha.uma)


उमा इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय राहते आणि नेहमीच रील व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिचे ९ लाख २१ हजार फॉलोअर्स आहेत. तिचे अनेक व्हिडिओ शेअर होत असतात.