Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अभिषेक-ऐश्वर्या हे घटस्फोट घेणार असल्याच्या वावड्याही उठत होत्या. मात्र, दोघांच्यात सारं काही आलबेल सुरू आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्तही दोघांनी फोटो पोस्ट करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, अभिषेक बच्चनची बहिणी श्वेता नंदा हिच्या एका पोस्टने मात्र पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. श्वेता आणि ऐश्वर्या  यांच्यातून विस्तव जात नाही हे उघड आहे. त्यातच ऐश्वर्या आणि श्वेता नंदा हिची मुलगी नव्या नवेली यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत ऐश्वर्याने सरळ सरळ नव्या नंदाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी 2007 साली लग्न केले. दोघांनी रावण, गुरू, धुम 2 या चित्रपटात एकत्र काम केले होते. अभिषेक-ऐश्वर्या यांना आराध्या नावाची मुलगी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांचे फोटो व व्हिडिओदेखील खूप व्हायरल होत असतात. अलीकडेच एका कार्यक्रमात आराध्याच्या लूकची खूप चर्चा होत होती. ऐश्वर्यासोबत अनेक कार्यक्रमांना आराध्याची हजेरी आवर्जुन असते. अलीकडे व्हायरल झालेल्या व्हिडिओत, अराध्यादेखील ऐश्वर्यासोबत दिसत आहे. 


प्रो कबड्डी लीगच्या एका मॅच दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. युपी योद्धास आणि जयपूर पिंक पँथर यांच्यातील सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. ऐश्वर्या आणि अराध्य इलेक्ट्रोनिक गेटमधून आत येत आहेत. त्यावेळी ऐश्वर्या राय बच्चन आराध्यासोबत येतेय. मात्र मागून येणाऱ्या नव्या नंदाकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले. नव्या नंदा तिकिट पंचिंगसाठी गेटबाहेर थांबलेली असताना ऐश्वर्या आणि अराध्य सरळ पुढे निघून गेल्या. एकदा मागे वळून नव्या मागे आहे का याची शहानिशादेखील केली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एकीकडे अराध्या आणि ऐश्वर्या नव्या नंदाकडे दुर्लक्ष करुन पुढे निघून जात असताना  अभिषेकदेखील पुढच्या गेटने आत आला. अभिषेकनेही ऐश्वर्या-आराध्यप्रमाणे नव्याकडे दुर्लक्ष केले. सोशल मीडियावर आता त्यांच्या या कृतीमुळं ट्रोल केले जात आहे. अनेकांनी ऐश्वर्याला खडे बोल सुनावले आहेत. तर, ऐश्वर्या अॅटिट्युड दाखवत आहे, अशी टीका अनेकांनी केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत ऐश्वर्यावर टीका केली आहे. तर, काहींनी तिचे समर्थनही केले आहे.