मुंबई : 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास हा अनेकांच्याच गळ्यातील ताईत. तरुणींमध्ये तर या दाक्षिणात्य सुपरस्टारचं खास वेड. असा हा अभिनेता कायमच प्रकाशझोतात असतो ते म्हणजे त्याच्या खासगी आयुष्यामुळेसुद्धा. प्रभासच्या आयुष्यात असणारी ती खास व्यक्ती कोण, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. किंबहुना याच्याशी संबंधित काही उत्तरंसुद्धा समोर येतात. पण, खुद्द प्रभासनेच आता सर्वांसमक्ष थेट त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचं म्हणजेच 'एक्स गर्लफ्रेंड'चं नाव उघड केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ही माझी एक्स गर्लफ्रेंड', असं मोठ्या उत्साहात सांगण्याऱ्या प्रभाच्या मनावर राज्य आहे, ते म्हणजे बॉलिवूडमधील अभिनेत्री रवीना टंडन. 'नच बलिये' या डान्स रिऍलिटी शोमध्ये 'साहो' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पोहोचलेल्या प्रभासने यावेळी हे वक्तव्य केलं. 


सोशल मीडियावर सध्या या भागातील एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये साहो प्रभास हा रवीनासोबत तिच्या प्रचंड गाजलेल्या 'टीप टीप बरसा पानी', या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. मुख्य म्हणजे प्रभासचा हा अंदाज पाहून रवीना आणि कार्यक्रमाला उपस्थिती असणारी त्याची चित्रपटातील सहकलाकार अभिनेत्री श्रद्धा कपूर हिलाही धक्काच बसला. 




आपल्या आवडत्या अभिनेत्रीसोबत तिच्या अत्यंत गाजलेल्या गाण्यावर नृत्य करण्याची संधी मिळणं ही एखाद्या चाहत्यासाठी एक सुवर्णसंधी ठरते, त्याचप्रमाणे प्रभाससाठीही ही एक सुवर्णसंधीच होती. जी त्याने हातची जाऊ दिली नाही. इतकच नव्हे, तर यावेळी तो सलमानच्या अंदाजातही दिसला. एकंदरच काट, तर 'नच बलिये'च्या मंचावर साहोच्या निमित्ताने आलेल्या प्रभासने एकच धमाल केली हे खरं.