गायिका तुलसी कुमार थोडक्याच बचावली आहे. एका म्युझिक व्हिडीओच्या शुटिंगदरम्यान तुलसी कुमार जखमी झाली आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुलसी कुमार कॅमेऱ्यासमोर परफॉर्म करताना दिसत आहे. यादरम्यान अचानक दुर्घटना झाली आणि या दुर्घटनेत ती जखमी झाली. या घटनेनंतर सेटवरील सर्वांचीच धावपळ झाली. 


तुलसी कुमार जखमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, तुलसी कुमार गाण्याचं शूट करत होती. यावेळी सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण अचानक तिथे उभारण्यात आलेल्या कृत्रिम भिंती कोसळू लागल्या. सर्वात आधी तिच्या उजव्या बाजूची भिंत कोसळते. व्हिडीओत ऐकू येत आहे त्यानुसार हा गाण्याचाच भाग होता. पण यानंतर मागची भिंत चुकून पुढच्या बाजूला कोसळते. पण यावेळी तुलसी कुमारला काहीच कल्पना नसते. यादरम्यान दिग्दर्शक 'बाजूला हो' असं ओरडतो. पण तिने ऐकण्याआधीच मागील भिंत कोसळते. ही भिंत कोसळल्यानंतर पाठीला लागून ती पुढे ढकलली जाते. 


ही कृत्रिम भिंत कोसळत असल्याचं लक्षात येताच काहीजण मदतीसाठी धाव घेतात. पण तोपर्यंत ती कोसळते आणि तुलसी कुमारच्या पाठीला स्पर्श करते. व्हिडीओत तुलसी कुमारच्या पाठीला दुखापत झाली असून ती वेदनेने विव्हळत असल्याचं दिसत आहे. यावेळी काही लोक तिला मदत करत  होते.



चाहते व्हिडीओवर झाले व्यक्त


या व्हिडीओवर अनेक चाहते व्यक्त झाले आहेत. एका चाहत्याने, 'ती सुखरुप असेल अशी आशा,' असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने तिच्या मदतीसाठी वेळीच धाव घेणाऱ्याचं कौतुक केलं आहे. एकाने आपण सुरक्षेच्या बाबतीत फारच हलगर्जीपणे वागत असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी हे फार धक्कादायक असून, ती सुखरुप असावी अशी आशा व्यक्त केली आहे. 


तुलसी कुमार कोण आहे?


तुलसी ही दिवंगत गुलशन कुमार आणि सुदेश कुमारी यांची मुलगी आहे. ती चित्रपट निर्माता भूषण कुमारची बहीण आणि अभिनेता खुशाली कुमारची चुलत बहीण आहे. तिने 2009 मध्ये तिचा पहिला अल्बम 'लव्ह हो जाये' रिलीज केला. अल्बमसोबतच तिने शीर्षक गीतासाठी एक म्युझिक व्हिडिओ बनवला होता. तिने 'मुझे तेरी' (पाठशाला), लव मेरा हिट (बिल्लू), आणि तुम जो आये (वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई) ही गाणीही गायली आहेत.


तुलसी कुमारचं करिअर


मैनु इश्क दा लगा रोग, सनम रे, सोच ना सके, देख लेना, इश्क दी लट्ट, सलामत, नाचेंगे सारी रात, दिल के पास, वजा तुम हो, आणि दिल में छुपा लुंगा ही गाणीही गायली आहेत.