Sunny Deol Viral Video : कलाकारांना ज्यावेळी आपण मोठ्या पडद्यावर पाहतो तेव्हा त्यातल्या किमान एखाद्या चेहऱ्याला तरी प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा मनी बाळगतो. बरं हे शक्य होणार नाही असंच आपलं मत असतं. पण, ते म्हणतात ना; नियतीत असेल तर काहीही शक्य होतं. अगदी जगाच्या टोकावर असणाऱ्या व्यक्तीचीही तुम्हाला भेट घडून येते. एखादा कलाकारही असाच योगायोगानं तुम्हाला भेटतो. किंवा भेटूही शकतो. विश्वास बसत नाहीये? सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ आताच पाहा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ शेअर केला आहे खुद्द अभिनेता (Sunny Deol Video) सनी देओल यानं. वय वाढत असलं तरीही शारीरिक सुदृढतेच्या बळावर सनी देओल नव्या जोमाच्या कलाकारांनाही लाजवत आहे. सध्या तो आगामी 'गदर 2' (Gadar 2) या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. याचदरम्यान घडलेला एक प्रसंग सनीनं चाहते आणि फॉलोअर्सच्या भेटीला आणला. 


व्हिडीओ वारंवार पाहिला जातोय....


सनीनं शेअर केलेला व्हिडीओ (Sunny Deol Instagram) आणि त्यात दिसणारी एक व्यक्ती त्यांच्या साधेपणामुळं सर्वांच्याच मनात घर करत आहे. अहमदनगरमध्ये चित्रीकरण करताना एके संध्याकाळी रस्त्यावरून बैलगाडी हाकत एक शेतकरी काका पुढे जात अतानाच सनी तिथं येतो असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांची भेट होते, गप्पाही होतात. तरीही हा अभिनेता आहे याची कल्पनाही काकांना येत नाही. 


हेसुद्धा वाचा : Amitabh Bachchan gets Injured: अ‍ॅक्शन सीनदरम्यान अमिताभ बच्चन जखमी, जाणून घ्या कशी घडली घटना


 



'तुम्ही सनी देओलसारखे दिसता... ' असं ते काका अतिशय समंजसपणे सनीला संबोधून म्हणतात आणि तो हळूच हसतो, पुढे म्हणतो, 'हो तो मीच आहे...'. बस्स, आपल्या समोर खुद्द सनी देओल उभा आहे हे पाहून ते काकाही नि:शब्द झाले. (Sunny Deol Instagram Video) 'अरे बाप रेss', इतकीच काय ती प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंदच सर्वकाही सांगून गेला. तर, या कानाकोपऱ्यातील चाहत्यांना भेटून आणि त्यांचा खरेपणा पाहून सनी देओलही भारावला. असा हा व्हिडीओ आजच्या दिवसातील सर्वात BEST VIDEO म्हणावा लागेल... नाही का?