Amitabh Bachchan Injured : अ‍ॅक्शन सीनदरम्यान अमिताभ बच्चन जखमी, जाणून घ्या कशी घडली घटना

Amitabh Bachchan Injured:  बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा हैदराबादेत अपघात झाला आहे. चित्रपटातील अ‍ॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना अमिताभ यांना दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीत नक्की काय झालं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या... अमिताभ यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

Updated: Mar 6, 2023, 01:06 PM IST
Amitabh Bachchan Injured : अ‍ॅक्शन सीनदरम्यान अमिताभ बच्चन जखमी, जाणून घ्या कशी घडली घटना title=

Amitabh Bachchan Injured: बॉलिवूड अभिनेता अमिताभ (Amitabh Bachchan) हे 80 वर्षांचे असले तरी देखील आजही चित्रपटांमध्ये स्वत: अ‍ॅक्शन सीन्स देतात. या सगळ्यात आता मोठी बातमी समोर आली आहे की नुकतंच अमिताभ हे जखमी झाले आहेत. अमिताभ यांना ही गंभीर दुखापत झाल्याची ही बातमी त्यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. अमिताभ बच्चन हे त्यांचा आगामी चित्रपट 'प्रोजेक्ट के' च्या शूटिंगसाठी हैदराबादला पोहोचले होते. त्यावेळी त्यांचे अ‍ॅक्शन सीन्स देताना त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. सध्या अमिताभ हे त्यांच्या घरी मुंबईत परतले आहे. या विषयी अमिताभ यांनी ब्लॉग शेअर करत याची माहिती दिली आहे. 

अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या अपघाता विषयी सांगत मोठा खुलासा केला आहे. 'हैदराबादमध्ये मी 'प्रोजेक्ट के' (Project K) चं चित्रीकरण करत होते. दरम्यान, चित्रपटात एक अ‍ॅक्शन सीन होता आणि तो सीन शूट करत असताना मला दुखापत झाली. माझ्या बरगड्यांना मार बसला आहे आणि त्यासोबतच उजव्या बाजुच्या दोन बरगड्यांनमधल्या स्नायुंना दुखापत झाली आहे. त्यामुळे शूटिंग रद्द करण्यात आलं आहे. एआईजी रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि सीटी स्कॅन केला आहे. आता मी हैदराबादवरून घरी परतलो आहे. पट्ट्या बांधल्या आहेत आणि त्यावर उपचार सुरु आहेत. हे खूप त्रासदायक आहे, मला श्वास घ्यायला आणि हलायला त्रास होतोय. तर प्रकृती सुधारण्यास आठवडे जातील. सगळं नीट होण्याआधी जो त्रास होतोय त्यावर गोळ्या सुरु आहेत', असे अमिताभ त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हणाले आहेत. 

पुढे त्यांच्या ब्लॉगमध्ये अमिताभ म्हणाले, "जखमी झाल्यामुळे त्यांचे जे आधीच काही प्लॅन्ड कामं होती ती थांबवण्यात आली आहेत. जो पर्यंत उपचार पूर्ण होत नाही तो पर्यंत सगळी काम ही बंदच रााहतील. आता मी जलसामध्ये आराम करत असून होणाऱ्या सगळ्या गोष्टींवर जमेल तितकं लक्ष ठेवून आहे. आज संध्याकाळी माझ्या चाहत्यांशी जलसा गेटवर भेटू शकणार नाही... तर येऊ नका... आणि जे येणार आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा... बाकी सगळं ठीक आहे."

हेही वाचा : '2020 हे वर्ष होतं खूपचं वाईट', Sara Ali Khan चा मोठा खुलासा

'Project K' मध्ये कोणते कलाकार असणार? 

दरम्यान, 'प्रोजेक्ट के' विषयी जाणून घ्यायचं असेल तर या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा मुख्य भूमिका साकारणार आहे. तर त्याच्यासोबत बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन आहेत.