मुंबई : कितने अजीब रिश्ते है यहा के..... या ओळी बॉलिवूडमधील नातेसंबंधांसाठी अतिशय पूरक आहेत, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण, इथं प्रेमाचा बहर आलेली नाती क्षणार्थात इतकी बदलतात की विश्वासही ठेवणं कठीण होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज एकमेकांच्या प्रेमात आकंठ असणारी मंडळी इथं उद्या तुम्हाला एकमेकांकडे पाहणंही टाळतात. अशाच एका नात्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.


हे नातं होतं बच्चन आणि कपूर कुटुंबाचं. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात संपूर्ण जगानं त्यांच्या कुटुंबाची होणारी सून पाहिली. 


आता तुम्ही म्हणाल, ती ऐश्वर्या होती का? तर नाही. ती होती करिष्मा कपूर. 'मी बच्चन आणि नंदा कुटुंबासोबत आणखी एका कुटुंबाचं स्वागत करते हे कुटुंब आहे कपूर', असं म्हणत जया बच्चन यांनी सर्वांसमोर करिष्माचा उल्लेख आपली होणारी सून म्हणून केला. 


होणाऱ्या सासुबाईंनी आपली अशी ओळख करुन देणं हे करिष्मासाठी अगदी नवं होतं. तिचा लाजरा चेहरा हेच सांगून जात होता. 



अतिशय सुरेख वळणावर आलेला हा प्रवास मात्र पुढे जाऊन दुराव्याच्या रुपात बदलला. नात्यांची ही गणितं फारच बदलली, आजच्या क्षणाला अभिषेक आणि करिष्मा त्यांच्या आयुष्यात बरेच पुढे आले. पण, हा व्हिडीओ मात्र आजही सोशल मीडियावर तितकाच चर्चेत आहे.