मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्याचप्रमाणे अनुष्का- विराट यांची जोडी प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. स्टायलिश कपल म्हणूनही ते ओळखले जातात. अशा या जोडीचा लक्षवेधी अंदाज हल्लीच पार पडलेल्या एका कार्यक्रमात पाहायला मिळाला. नुकताच संपन्न झालेल्या‘इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स’मध्ये अनुष्का आणि विराटने हजेरी लावली होती. इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स’च्या दुसऱ्या वर्षी क्रीडा क्षेत्रातील विविध खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फार कमी वेळातच प्रशंसनीय कामगिरी बजावणाऱ्या विराटची त्याच्या पत्नीकडून स्तुती करण्यात आली. अनुष्काने यावेळीसुद्धा पतीला पाठिंबा देण्याची संधी दवडली नाही, असंच म्हणावं लागेल. 'मी या कार्यक्रमात उपस्थित असल्याचे फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे माझे पती विराट. मला त्याचा फार अभिमान वाटतो. तो भारताच्या भविष्यासाठी फार चांगलं काम करत आहे', असं ती म्हणाली


आरपी- एसजी ग्रुपचे अध्यक्ष संजय गोएंका आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. १७ खेळातील वेगवेगळ्या खेळाडूंना यावेळी सन्मानित करण्यात आले. 'आईएसएच'च्या ज्यूरी सदस्यांद्वारा ११ श्रेणींमधील विजेत्यांची निवड यावेळी करण्यात आली.


विराट प्रत्येक वर्षी तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी इंडियन स्पोर्ट्स ऑनर्सचं आयोजन करत असतो. ज्यूरीमध्ये पुलेला गोपीचंद, अभिनव बिंद्रा, सरदार सिंह, महेश भूपती, पी.टी. उषा आणि अंजली भागवत यांसारखे क्रिडापटू उपस्थित होते. या विजेत्यांचा निर्णय सोशल मीडियाच्या मदतीने घेण्यात आला. यासाठी ट्विटरवर ऑनलाईन वोटिंग घेण्यात आली होती.