मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हे दोघे जेव्हा पण एकत्र दिसतात तेव्हा ते कायमच चर्चेत असतात. लग्नाअगोदर हे दोघं आपल्या नात्याबद्दल खूप कमी बोलायचे मात्र आता असं नाही. आता हे दोघं आपल्या नात्याबद्दल अगदी भरभरून बोलतात. अशातच अनुष्काने आपल्या नात्याबद्दल एक गोष्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्का हल्लीच इंग्लडमध्ये दिसली जिथे टीम इंडिया आपल्या दौऱ्यासाठी गेली होती. त्यामुळे हे दोघं फक्त नवरा बायकोच नाही तर चांगले मित्र देखील आहेत. अनुष्काने एक मैत्रिण म्हणून देखील ती कोहलीसोबत मैदानावर असते. 


अनुष्काने एका मुलाखतीत कोहलीचं भरपूर कौतुक केलं होतं. ती म्हणाली होती मी आणि अनुष्का पर्सनल लाइफमध्ये अगदी सामान्य लोकांप्रमाणे असते. आम्ही एकमेकांना दोन व्यक्ती मानतच नाहीत. आम्ही फक्त एकमेकांचे मेल आणि फिमेल वर्जन आहेत. यामुळेच आमचं नातं इतकं चांगल आहे. पुढे अनुष्का म्हणाली की, विराट आध्यात्मिक आहे. त्यामुळे त्याचं वेगळेपण आहे. आता विराट कोहलीची टीम आशिया कपमध्ये सहभागी झाली आहे. कालच कोहलीच्या संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला.