मुंबई : अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहलीने (Virat Kohali) ११ जानेवारी २०२१ रोजी मुलीचं स्वागत केलं. अनुष्का-विराटच्या मुलीची पहिली झलक आणि नाव जाणून घेण्यासाठी सगळेचं उत्सुक आहेत. पहिल्यांदा अनुष्काने मुलीची पहिली झलक आणि नाव शेअर केलं आहे. अनुष्काने इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. आपल्या मुलीचं नाव अतिशय सुंदर ठेवून (Virat Kohli and Anushka Sharma Baby Girl Name Vamika) त्यांनी चाहत्यांची मन जिंकली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने मुलीचं नाव वामिका (Vamika)  ठेवलं आहे. आपण आतापर्यंत प्रेमाने आमचं जीवन जगलं आहे. पण या चिमुकल्या वामिकाने त्याला वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवलं आहे. अश्रू, हसू, आनंद, चिंता कधी कधी या भावना अगदी कमी वेळात जाणवतात. झोप उडाली आहे पण आमचं हृदय आनंदाने भरलं आहे. तुमच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि पॉझिटीव्ह एनर्जी करता आभार..... 



फोटोमध्ये विराट आणि अनुष्का बेबी गर्लला कडेवर घेताना दिसतायत. दोघांचा फोटो खूप सुंदर दिसतोय. फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडतोय. चाहत्या कमेंटच्या माध्यमातून नव्या पाहुणीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनुष्का-विराटच्या मुलीचा जन्म हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात झाला. विराटने सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी शेअर केली आहे. 


लेकीच्या जन्मानंतर विराट देखील अजिंक्य रहाणे, महेंद्र सिंह धोनी, आर अश्विन, चेतेश्वर पुजारा, गौतम गंभीर, हरभजन सिंह यांच्या रांगेत आहे. या सर्व क्रिकेटर्सना गोंडस मुली आहेत. 



  


 विराट आणि अनुष्काने बाळाची सुरक्षा आणि प्रायव्हसी जपण्यासाठी कॅमेरासमोर येणं टाळलं होतं. मात्र आता इतक्या दिवसांनी ते पहिल्यांद एकत्र दिसले. बाळाच्या नियमित चेकअपसाठी विरुष्का दवाखान्यात आले होते. तेव्हा काही फोटोग्राफर्संनी त्यांना कॅमेरात कैद केलं. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघांनी एकत्र पोज दिल्या, तसंच मीडिया पत्रकार आणि फोटोग्राफर्स यांचेही त्यांनी आभार मानले.