Kulwinder Kaur Slapped Kangana Ranaut : हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून विजयी झालेली भाजपची नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) चंदीगड विमानतळावर CISF च्या महिला सुरक्षा रक्षकाने कानशिलात लगावली होती. चंदीगडवरून दिल्लीला जात असताना ही घटना घडली. या प्रकरणानंतर महिला जवानाला ताब्यात घेतलं अन् कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कुलविंदर कौर (Kulwinder Kaur) कंगना रणौतच्या किसान विरोधी वक्तव्यावरुन नाराज होती. या प्रकरणावरून अनेक ठिकाणहून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच प्रसिद्ध गायक आणि म्युझिक डायरेक्टर विशाल ददलानी (Vishal Dadlani) कुलविंदर कौरच्या मदतीसाठी धावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाल ददलानीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमुळे आता एकच चर्चा रंगल्या आहेत. विशाल ददलानीने थेट त्या सीआयएसएफ महिलेचे कौतुक करत तिला जॉबची ऑफर दिली आहे. त्यामुळे आता बॉलिवूड दोन भागात विभागलं गेल्याचं पहायला मिळतंय. काहींनी कुलविंदर कौरच्या कृतीवर राग व्यक्त केला होता तर काहींनी  कुलविंदर कौरला बक्षिस जाहीर केलंय. (Vishal Dadlani promises job to Kulwinder Kaur)


Vishal Dadlani ने काय म्हटलंय?


मी कधीही हिंसेचे समर्थन करत नाही पण सीआयएसएफ जवान महिलेचा राग मी पूर्णपणे समजू शकतो. त्या महिलेवर कारवाई झाली तर मी तिला नोकरी देईन, जर तिला ते मान्य असेल तर. जय हिंद, जय जवान आणि जय किसान, अशी स्टोरी विशाल ददलानीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.


संजय राऊत म्हणतात...


कॉन्स्टेबलनं तिच्या आईसाठी कायदा हातात घेतला. भारत मातासुद्धा त्यांची आई आहे आणि जे शेतकरी आंदोलनाला बसले होते, ते भारतमातेचे पुत्र होते, कन्या होत्या. जर कोणी भारतमातेचा अपमान केला असेल आणि कोणाला राग आला असेल तर मला असं वाटतं की त्याविषयी विचार केला पाहिजे. खासदारांवर कोणी हात उचलू नये, तर देशात शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


 कुलविंदर कौरला काय शिक्षा होणार?


भारतीय दंड संहितेच्या कलम 352 नुसार जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही कारणाशिवाय पीडित व्यक्तीवर हल्ला केला तर अशा व्यक्तीला तीन महिने तुरुंगवास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. तसेच  आयपीसी कलम 323 अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई केली जाऊ शकते. कलम 323 म्हणजे, जर कोणी जाणूनबुजून एखाद्याला इजा किंवा फसवणूक केली तर त्याला एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो किंवा एक हजार रुपये दंड किंवा तुरुंगवास आणि दंड दोन्ही होऊ शकतात.