मुंबई : एखादी वस्तू, उत्पादन किंवा सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असते त्यावेळी सर्वात प्रभावी असं माध्यम वापरलं जातं. ज्यामध्ये सहाजिकच समावेश आहे तो म्हणजे जाहिरातींचा. साधी, सऱळ सोपी तरीही तितकीच कलात्मक आणि प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी अशी एक जाहिरात साकारण्यासाठी अनेकजणांचे प्रयत्न सुरु असतात. अशाच या जाहिरातींच्या गर्दीत वोडाफोन सध्या प्रभावीपणे बाजी मारत आहे. यामध्ये त्यांना साथ मिळत आहे ती म्हणजे एका चिरतरुण जोडप्याची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बाला' आणि 'आशा' असं हे जोडपं त्यांच्यात उडणारे क्षण खटके, त्यांचा दाक्षिणात्य भाषेचा अनोखा आणि तितकाच आपलासा वाटणारा अंदाज या साऱ्याच्या बळावर वोडाफोनच्या जाहिरातींना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याच खास आणि तितक्याच हरहुन्नरी जोडीची प्रेकहाणीही तितकीच लक्षवेधी आणि रंजक आहे. 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'च्या अधिकृत फेसबुक पेजवरुन यांची लव्ह ऍट फर्स्ट साईट... अशीच काहीशी वाटणारी प्रेमकहाणी पोस्ट करण्यात आली आहे. 


Vannadil Pudiyaveettil Dhananjayan आणि Shanta Dhananjayan अशी या दोन्ही कलाकारांची नावं आहेत. आपल्या नात्याच्या या अनोख्या प्रवासाविषयी सोशल मीडियावर प्रसिद्धीझोतात आलेल्या आजोबांनी माहिती दिली आहे. एका गरीब कुटुंबात जन्मल्यानंतर १३ वर्षांचे असताना Vannadil Pudiyaveettil Dhananjayan यांच्या वडिलांना कथकलीच्या गुरुंनी त्यांना कलाक्षेत्र या कला शिक्षण देणाऱ्या संस्थेत जाण्याचा सल्ला दिला. त्याच ठिकाणी त्यांचं आयुष्य पुरतं बदलून गेलं. कारण, तेथे त्यांना खऱ्या अर्थाने जीवनाचा सूर गवसला. सोबतच आयुष्यभराची जोडीदारही .... 



Shanta शांता यांना पाहताचक्षणी आपण त्यांच्याशी जोडलो गेलो असल्याची अनुभूती त्यांना झाली. पुझे त्या शैक्षणिक संस्थेच्या आवारात त्यांचं हे नातं शिक्षणाच्याच साथीने आणखी परिपक्व होत गेलं. शालेय जीवनानंतरही आपण एकत्र राहू असं वाटत असताना शांता सिंगापूरला त्यांच्या घरी गेल्या आणि Vannadil यांनी पुढचं शिक्षण घेणं सुरूच ठेवलं. पण, त्यांना कायम शांता यांची अनुपस्थिती भासू लागली होती. काहीतरी कमी असल्याचं त्यांना वारंवार वाटत होतं. तीन वर्षांनंतर एका नृत्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शांता त्यांना पुन्हा भेटल्या. त्याचवेळी आपल्या मनी असणाऱ्या भावनांविषयी सारंकाही सांगण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. कारण, पुन्हा अशी संधीच मिळू शकली नसती. 


अखेर Vannadil यांनी भावना व्यक्त केल्या आणि शांता यांनीसुद्धा. शांता यांच्या पालकांना त्यांच्या मुलीच्या भावी सुखी आयुष्याची हमी Vannadil यांनी दिली आणि बस्स.... त्यानंतर या दोघांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. भारतात आल्यानंतर शांता आणि Vannadil वण्णडील यांनी नृत्यकलेच्या अनुशंगाने एका ग्रुपच्या साथीने कला सादर करण्यास सुरुवात केली. कार्यक्रमांच्या निमित्ताने विविध ठिकाणी त्यांचं फिरणं होत होतं. 



पुढे लग्न आणि पहिलं अपत्य झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अडचणींची सुरुवात झाली. नृत्यकलेच्या माध्यमातून, कार्यक्रमांच्या माध्यमातून जे काही पैसे साठवले होते, ते आता कमी पडू लागले होते. अखेर Vannadil Pudiyaveettil Dhananjayan यांनी नोकरी सुरु केली आणि शांता यांनी नृत्य अकादमी सुरू केली. नोकरी सांभाळून Vannadil यांनी नृत्याचा सरावही सुरुच ठेवला. ज्या बळावर ते विवाहसंमारंभ आणि विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी नृत्य सादर करण्यास सुरुवात केली. या गोष्टी करणं त्यांना भाग होतं. 



काळ लोटला तसतशी काही वर्षांनी परिस्थिती बदलली. या दोघांना वेगळी ओळख मिळाली. विद्यार्थी मिळू लागले. ज्यानंतर Vannadil Pudiyaveettil Dhananjayan यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. Dhananjayans म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या या जोडीला पद्मभूषण पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं. आता तर, वोडाफोनच्या जाहिरातींच्या निमित्ताने ही जोडी #CoupleGoals देत जोडी असावी तर अशी... हेच जणू सर्वांना सांगत आहे. जवळपास ५३ वर्षे एकत्र असूनही आपल्यातील प्रेम आणि आपलेपणा तसूभरही कमी झालेलं नाही असं Vannadil Pudiyaveettil Dhananjayan आवर्जून सांगतात. आजही शांता यांच्या डोळ्यांत पाहताना त्यांच्या मनात त्याच भावना असतात ज्या ते १३ वर्षांचे असताना होत्या. त्यांच्या सहजीवनाचा हा प्रवास पाहता 'तुम देना साथ मेरा....' या गाण्याच्या; ओळी  गुणगुणाव्याश्या वाटतात.... नाही का? #LiveMore